Health Care News : मासिक पाळीच्या काळात फक्त दोनच दिवस रक्तस्त्राव होतो, काय आहे कारण जाणून घ्या

मासिक पाळी दरम्यान कमी रक्तस्त्राव होतो ? जाणून घ्या कारणे आणि उपाय
Health Care
Health Caresakal
Updated on

महिलांना दर महिन्याला मासिक पाळीतून जावे लागते. मासिक पाळी सामान्यतः 3-7 दिवसांसाठी येते. परंतु, कधीकधी, काही स्त्रियांसाठी हे वेगळे असू शकते. काही स्त्रियांना मासिक पाळी ३ दिवसांपेक्षा कमी किंवा ७ दिवसांपेक्षा जास्त असते. अनेक महिलांना मासिक पाळीत फक्त एक दिवस रक्तस्त्राव होतो. हे सामान्य आहे की डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे?

तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळींमध्ये साधारणपणे २८ दिवसांचे अंतर असते म्हणजेच २८ दवसांचे चक्र असते. परंतु, ते 21 ते 35 दिवसांच्या दरम्यान देखील येऊ शकते. मासिक पाळीचे चक्र बिघडले का अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. हार्मोनल बदल होणे, चेहऱ्यावर केस येणे, पीसीओडी या सारख्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे स्त्रीची मासिक पाळी वेळेत येणे फार गरजेचे असते.

Health Care
Mental Health : ताण-तणावापासून आराम मिळवण्यासाठी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स, तुमचे मानसिक आरोग्य राहील उत्तम

मासिक पाळी दरम्यान कमी रक्तस्त्राव होण्याची कारणे

थायरॉईड हार्मोन्सचे असंतुलन

पेरीमेनोपॉज दरम्यान हे अनेक वेळा घडते.

चिंता, ताण आणि नैराश्य

पीसीओडी

असंतुलित आहार

वजन झपाट्याने कमी होणे

वजन जास्त असणे

घरगुती उपाय

पालक आणि गाजराचा रस

शरीरात रक्ताची कमतरता असतानाही मासिक पाळीत कमी रक्तस्राव होतो. जर तुम्हालाही हा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात पालक आणि गाजराच्या रसाचा समावेश करावा.

हिंग

हिंगाच्या सेवनाने शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोनचे प्रमाण वाढते. त्यामुळे कमी रक्तस्रावाची समस्याही दूर होते. म्हणूनच तुमच्या आहारात हिंगाचा वापर करा.

उसाचा रस प्या 

मासिक पाळीत कमी रक्तस्रावाची समस्या टाळण्यासाठी उसाचा रस खूप फायदेशीर आहे. म्हणूनच मासिक पाळी सुरू होण्याच्या १४ दिवस आधी दररोज एक ग्लास उसाचा रस पिणे सुरू करा.

दालचिनी  

मासिक पाळीत योग्य रक्तस्राव होत नसल्यास दालचिनीचा वापर करावा. कोमट पाण्यात दालचिनी पावडर मिसळा आणि दिवसातून 2-3 वेळा प्या. यामुळे रक्तस्राव चांगला होईल आणि मासिक पाळीचा त्रासही दूर होईल.

Related Stories

No stories found.