मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात पोस्टपर्टम डिप्रेशन (पीपीडी) चे प्रमाण जवळपास २२% आहे. प्रसूतीनंतरचा कालावधी जो प्रसूतीनंतर लगेचच ४२ दिवसांनी येतो हा सर्व मातांसाठी शारीरिक, भावनिक आणि मानसिक बदलांचा गंभीर कालावधी असतो.
प्रसुतीदरम्यान असलेला उत्साह, प्रसूतीनंतर आलेला शारीरिक थकवा, शारीरिक बदल या सर्वच गोष्टी नव्याने आईपण अनुभवणाऱ्या स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. याबद्दल सांगत आहेत मेडिकोव्हर हॉस्पिटल्सच्या सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनु विज. हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
पोस्टपार्टम डिप्रेशन ( प्रसूतीनंतर येणारे नैराश्य)
बाळाबद्दल नकारात्मक किंवा द्विधा मनःस्थिती किंवा मी एक चांगली आई होऊ शकते का, मी बाळाचा नीट सांभाळ करु शकेन का ? याबद्दल शंका निर्माण होऊन नैराश्य येते.
प्रसूतीदरम्यान होणारे मानसिक विकार हे तीन प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत बेबी ब्लूज, पोस्टपर्टम सायकोसिस आणि पोस्टपार्टम डिप्रेशन. बाळाच्या जन्मानंतर सुरू झालेला नवीन दिनक्रम, खाण्यापिण्याचे, झोपेचे बदललेले वेळापत्रक, पुरेशी विश्रांती न होणे अशा प्रकारांतून ही लक्षणे दिसण्यास सुरुवात होते.
लक्षणे कोणती
नैराश्य येणे, उदास वाटणे, चिंता, अस्वस्थता आणि आक्रमकता तसेच नात्यांमध्ये दुरावा जाणवणे अशी काही लक्षणे आढळून येतात. रडणे, राग येणे, प्रियजनांपासून दूर जाणे, आपल्या बाळापासून दूर गेल्याची भावना, आपण बाळाला दुखावू अशी चिंता, एक चांगली आई नसल्याचे वाटू लागणे आणि त्यामुळे स्वतःला दोषी ठरविणे किंवा बाळाची काळजी घेण्याच्या आपल्या क्षमतेवर सतत शंका घेणे.
आहाराच्या पद्धती, विशेषत: स्तनपान, झोपेची दिनचर्या, लसीकरण आणि बाळाची सुरक्षा या साऱ्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. ज्या स्त्रियांना प्रसूतीनंतर उदासीनता जाणवते त्यांना भविष्यात नैराश्याचा सामना करावा लागू शकतो.
निदान व उपचार न केल्यास काय होते ?
जर पीपीडी ओळखला गेला नाही आणि त्यावर वेळीच उपचार न केल्यास, प्रसूतीनंतर सायकोसिस नावाच्या अधिक गंभीर स्थितीचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे भ्रूणहत्या किंवा मातेची आत्महत्या असे प्रकार घडतात.
प्रसूतीनंतरचे नैराश्य आई व बाळाचे नाते बिघडवू शकते आणि त्याचा परिणाम बालपण आणि बाल्यावस्थेतील पुढील विकासावरही होतो. प्रसूतीनंतर उदासीनता येणे हे आईला नैराश्यासारख्या गंभीर परिणामास बळी पाडू शकते, ज्याचा परिणाम आई-बाळ यांच्या नातेसंबंधावर आणि मुलाच्या वाढीवर आणि विकासावर देखील होऊ शकतो.
प्रसूतीनंतरच्या नैराश्याचे प्रमुख कारण म्हणजे सामाजिक आणि कौटुंबिक आधाराची कमतरता. प्रसूती रुग्णालयात दाखल करताना मातांना गंभीर मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. मातांना मानसिकदृष्ट्या खचून न जाण्यासाठी मानसिक आधार देणे ही काळाची सर्वात महत्त्वाची गरज आहे.
पीपीडीबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे या आजाराला सहसा स्वीकारले जात नाही. त्यामुळे अनेक रुग्ण उपचार घेण्यासही नकार देतात. सर्वप्रथम जागरूकता निर्माण करणे आणि पीपीडीचा स्वीकार करुन त्यानुसार उपचार घेणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.