Women Health News: सध्या सणांची रेलचेल आहे. गौरी गणपती, महालक्ष्मी पुजन झाले की नवरात्री असे एका पाठोपाठ सण येतात. त्या दरम्यान जर मासिक पाळी येत असेल तर त्या नैसर्गिक ऋतुचक्रात बदल घडवून आणण्यासाठी म्हणजेच पाळी लांबवण्यासाठी सर्रास गोळ्या खाण्याचे प्रस्थ वाढले आहे. परंतु त्याचे दुष्परिणाम मात्र मोठे असून त्यासाठी जागृती होणे गरजेचे आहे.
श्रावण (ऑगस्ट) महिन्यापासूनच सणांची रेलचेल सुरु होते. गौरी गणपती, महालक्ष्मी पूजन, नवरात्री नंतर विविध धर्मातील धार्मिक यात्रा सुरु होतात. त्यात जर मासिक पाळी येत असेल तर मासिक पाळीच्या दरम्यान होणारा सर्वसाधारण त्रास, चिडचिड आणि पाळीचा विटाळ नको म्हणून शहरातच नाही तर खेडोपाड्यात सुद्धा पाळी लांबविण्याच्या गोळ्या खाण्याचे प्रस्थ वाढले आहे.
सणावारात, पूजेअर्चेत विघ्न नको म्हणून महिला व किशोरवयीन मुली सर्रास या गोळ्यांचा वापर करीत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी ना कोणत्याही प्रेस्क्रिप्शन गरज ना डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. थेट औषधी दुकानातून त्या खरेदी केल्या जातात. ( dont take pills to prolong menstruation )