Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर उपचारानंतर फक्त याच महिला करू शकतात ब्रेस्टफीडिंग, कारण..

या लेखात आपण इंदिरा आयव्हीएफचे सीईओ आणि सह संस्थापक डॉक्टर क्षितिज मुर्दिया यांच्याकडून ब्रेस्टफीडिंगबाबत काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया
Breast Cancer
Breast Canceresakal
Updated on

Breast Cancer : एक आई आपल्या बाळाला दूध पाजते हा अनुभव तिच्यासाठी जगातला सुखद अनुभव असतो. ब्रेस्टफीडिंग आई आणि बाळाच्या नात्याला बळकटी देते. मात्र काही महिलांना आई होण्याआधीच ब्रेस्ट कॅन्सर होतो. मग अशावेळी बाळा दूध पाजता येईल की नाही असा संभ्रम निर्माण होतो. या लेखात आपण इंदिरा आयव्हीएफचे सीईओ आणि सह संस्थापक डॉक्टर क्षितिज मुर्दिया यांच्याकडून ब्रेस्टफीडिंगबाबत काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय?

जगभरात ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे डॉ.क्षितिज सांगतात. 2020 मध्ये, जगभरात 2.3 दशलक्ष महिलांना या आजाराने ग्रासले होते आणि 685,000 महिलांना यामुळे आपला जीव गमवावा लागला होता. स्तनाचा कर्करोग बरा होण्याची शक्यता तो कोणत्या टप्प्यावर आढळतो यावर अवलंबून असतो. हा रोग बहुधा 40 किंवा 50 वर्षाच्या वयात होतो. स्तनाच्या कर्करोगाचा प्रजनन क्षमता आणि कुटुंब नियोजनावरही परिणाम होतो.

ब्रेस्ट कॅन्सरनंतर प्रेग्नंसी

डॉक्टरांचे म्हणणे आहे की,काही उपचारानंतर महिलांना गर्भधारणेत समस्या येतात, परंतु उपचारानंतरही अनेक महिला गर्भधारणा करतात. मात्र या आजारात केमोथेरपीने उपचार केले जाते, ज्यामुळे

Breast Cancer
Breast Feeding Week : बाळाला रात्री स्तनपान करण्याचे एवढे फायदे, 99% स्त्रियांना माहितीच नाही

प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेलियरचा धोका वाढतो, ज्यामुळे निरोगी पेशींवर परिणाम होतो आणि वंध्यत्व येते. मात्र, वैद्यकीय जगतातील प्रगतीमुळे आता महिला स्तनाच्या कर्करोगानंतरही गर्भधारणा करू शकतात.

ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रिटमेंटनंतर प्रेग्नंसीसाठी कधीपर्यंत बघावी वाट

डॉक्टर क्षितिज सांगतात की, स्तनाच्या कर्करोगावर उपचार केल्यानंतर गर्भधारणेसाठी किमान दोन वर्षे वाट पाहावी लागते. यामुळे कर्करोगाच्या पुनरावृत्तीचा धोका दूर होतो. स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारानंतरची पहिली दोन वर्षे अत्यंत संवेदनशील असतात. (Lifestyle)

Breast Cancer
Breast Cancer : स्तन कर्करोगाविषयी मुंबई शहरांतही अनभिज्ञता

ब्रेस्ट कॅन्सरनंतर ब्रेस्टफीडिंग

स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारानंतरही अनेक महिलांना बाळाला दूध पाजण्यात अडचणी येतात. शस्त्रक्रिया किंवा रेडिओथेरपीमुळे स्तनपानावर परिणाम होऊ शकतो आणि दूध उत्पादन कमी होण्याचा आणि स्तनामध्ये शारीरिक बदल होण्याचा धोका असतो. जर आई स्तनाच्या कर्करोगासाठी केमोथेरपी किंवा कोणतेही औषध घेत नसेल तर ती आपल्या बाळाला दूध देऊ शकते. (Health)

जर तुम्ही स्तनाच्या कर्करोगासाठी कोणतेही औषध घेत असाल, तर बाळाला दूध देण्यापूर्वी एकदा डॉक्टरांशी बोला. ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर स्त्रिया आपल्या बाळाला दूध पाजू शकत नाहीत असे नाही, पण डॉक्टरांकडून पूर्ण तपासणी करून घेतल्यानंतरच तुम्ही हे पाऊल उचलले पाहिजे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()