Vaginal Wash : व्हजायनाच्या स्वच्छतेसाठी चुकूनही या गोष्टी वापरू नका, नाहीतर...

व्हजायनाची काळजी घेताना कुठल्या गोष्टींची खबरदारी घ्यावी ते जाणून घेऊया.
Vaginal Wash
Vaginal Washesakal
Updated on

Vaginal Wash : शरीराचा प्रत्येक भाग हा फार महत्वाचा आहे. महिलांच्या शरीराचा भाग व्हजायना हा फार नाजूक असतो. तेव्हा व्हजायनाची स्वच्छता ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाचे प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे. तसेच कुठलेही प्रोडक्ट वापरण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. चला तर व्हजायनाची काळजी घेताना कुठल्या गोष्टींची खबरदारी घ्यावी ते जाणून घेऊया.

व्हजायना हा महिलांच्या शरीराचा फार सेसिटिव्ह पार्ट आहे. मार्केटमध्ये व्हजायनाच्या स्वच्छतेसाठी बरेच प्रोडक्ट उपलब्ध आहेत. मात्र तुम्हाला कल्पना नसलेले प्रोडक्ट तुम्ही विकत घेतल्यास व्हजायनाला हानी पोहोचू शकते. तेव्हा व्हजायनाच्या स्वच्छतेसाठी या काही गोष्टी निवडू नये.

Vaginal Wash
Irreular Periods : अनियमित मासिक पाळीचा त्रास दूर करण्यास मदत करेल ही एक गोष्ट, वाचा सविस्तर

साबणाचा वापर करणं टाळा

बाजार उपलब्ध असणारे साबण शरीरासाठी हानिकारक असतात. आपण वापरत असलेल्या साबणामध्ये केमिकल्स असतात. शिवाय साबणाने व्हजायनाची पीएच लेव्हल खराब होऊ शकते. पीएच लेव्हल खराब झाल्यास खाज सुटणं, पुरळ येणं आणि सूज येणं यांसारख्या समस्या उद्भवतात.

गरम पाणी

काही महिला व्हजायनाच्या स्वच्छतेसाठी गरम पाण्याचा वापर करतात. मात्र गरम पाण्याच्या वापराने तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशा वेळी तुम्ही गरम किंवा कोमट पाण्याने व्हजायना स्वच्छ करू शकता.

Vaginal Wash
Vaginal Health : योनिचे आरोग्य चांगले राखण्यासाठी PH कसा संतुलित कराल ?

सेंटेड वॉश

व्हजायनाची दुर्गंधी येऊ नये यासाठी सेंटेड वॉश उपलब्ध असतात. मात्र हे प्रोडक्ट त्वचेसाठी अत्यंत हानिकारक असतात. त्यांच्या वापरामुळे त्वचा काळी पडण्याची शक्यता आहे. तेव्हा तुम्ही सुगंधित वॉश, परफ्यून आणि पावडर वापरू नका. (Lifestyle)

व्हजायना साफ करण्याची योग्य पद्धत

व्हजायनल स्वच्छतेसाठी तुम्ही कुठल्याही प्रोडक्टचा वापर केला नाही तरी उत्तम. व्हजायना स्वच्छ करण्यासाठी तुम्ही केवळ पाण्याचा वापर करू शकता. यावेळी पाणी व्हजायनाच्या आता जाणार नाही याची काळजी घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.