Women’s Health: शारिरीक तंदूरूस्तीसाठी महिलांनी तिशीनंतर 'या' सुपरफूड्सचा आहारात करावा समावेश

Women’s Health: वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल मोठ्या प्रमाणात होतात. अनेकदा या बदलांमागे पोषकतत्वांची कमतरता ही असू शकते.
Women’s Health
Women’s Healthesakal
Updated on

Women’s Health : वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल मोठ्या प्रमाणात होतात. अनेकदा या बदलांमागे पोषकतत्वांची कमतरता ही असू शकते. थोडक्यात काय तर आहाराची नीट काळजी घेतली नाही तर याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो. मग, विविध प्रकारच्या शारिरीक आणि मानसिक समस्या सुरू होतात.

जर तुम्हाला निरोगी रहायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला वयाच्या तिशीनंतर महिलांनी आहारात कोणत्या सूपरफूड्सचा समावेश करायला हवा? त्याबद्दल सांगणार आहोत. कोणते आहेत हे सुपरफूड्स? चला तर मग जाणून घेऊयात.

Women’s Health
Monsoon Health Care : आला पावसाळा, तब्येतीला सांभाळा.! संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अशी घ्या आरोग्याची काळजी

दूध

अनेकदा महिलांच्या शरिरात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्सची कमतरता आढळून येते. ही दोन्ही पोषकतत्वे निरोगी आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहेत. या पोषकतत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी महिलांनी त्यांच्या आहारात कमी चरबीयुक्त दुधाचा समावेश करायला हवा.

यामुळे, तुमच्या शरिराला व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअमचा सुरळीत पुरवठा होईल. दुधाचे सेवन केल्याने तुमची हाडे बळकट होण्यास मदत होते. त्यामुळे, महिलांनी आणि लहान मुलांनी देखील त्यांच्या आहारात दुधाचा अवश्य समावेश करायला हवा.

टोमॅटो

टोमॅटो खायला अनेकांना आवडते. निरोगी राहण्यासाठी महिलांनी त्यांच्या आहारात टोमॅटोचा समावेश करणे आवश्यक आहे. कारण, टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचा घटक आढळून येतो. ज्यामुळे, स्तनाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून बचाव होतो.

टोमॅटोमध्ये विविध प्रकारच्या अँटीऑक्सिडंट्सचा समावेश असतो. ज्यामुळे, हृदयाशी संबंधित आजारांपासून तुमचा बचाव करण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर टोमॅटोचे सेवन केल्याने त्वचा निरोगी राहते. त्वचेसाठी देखील तुम्ही टोमॅटोचा वापर करू शकता.

दही

दही हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. त्यामुळे, अनेक जण त्यांच्या आहारात दह्याचा जरूर समावेश करतात. महिलांनी देखील त्यांच्या आहारात दही किंवा कमी चरबीयुक्त दह्याचा समावेश करावा.

काही संशोधनानुसार, दह्याचे सेवन केल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका देखील कमी होतो. तसेच, पोटाशी संबंधित समस्या ही दूर होतात. दह्याचे नियमित सेवन केल्याने पचनक्षमता सुधारण्यास मदत होते.

बेरीज

निरोगी आरोग्यासाठी महिलांनी त्यांच्या आहारात विविध प्रकारच्या बेरीजचा समावेश करायला हवा. यामध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी आणि क्रॅनबेरीचाही समावेश करू शकता. या बेरीजमध्ये कॅन्सरविरोधी घटक मोठ्या प्रमाणात आढळून येतात. काही संशोधनांमधून असे समोर आले आहे की, बेरीज महिलांना स्तनाच्या कर्करोगापासून दूर ठेवण्यास मदत करते.

Women’s Health
International Yoga Day 2024 : पहिल्यांदाच योगासनांचा सराव करताय? मग, ‘या’ सोप्या अन् फायदेशीर आसनांनी करा सुरूवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.