प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व ही महत्त्वाची भुमिका असते. महिलांना आई होण्याचं सुखं गर्भाशयामुळे लाभतं. गर्भाशय हा गर्भाशय स्त्रियांच्या प्रजनन व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पुरूष अन् स्त्रीतील शारीरिक संबंधानंतर नवा जीव गर्भात जन्माला येतो.
महिलेचे गर्भाशय हा अवयव जन्मापूर्वी गर्भाच्या विकासासाठी आणि पालनपोषणासाठी जबाबदार असतो. कोणत्याही महिलेला गर्भधारणेसाठी निरोगी गर्भाशय असणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, आजकालच्या चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे महिलांना गर्भाशयाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.