कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या माहिलांची मासिक पाळी, लसीकरण न घेतलेल्या महिलांच्या तुलनेत एक दिवस उशीरा येत असल्याचे युएस सराकारने अनुदानित केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. पण मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्रावाच्या दिवसांवर (days of bleeding) मात्र काही परिणाम झाला नाही असेगी संशोधनातून स्पष्ट झाले. साधारण ४००० महिलांवर हे संशोधन झाले असून ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॉकॉलॉजीमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीचे प्रमुख लेखक अॅलिसन एडेलमन यांनी एएफपीला सांगितले की,'' संशोधनातून समोर आलेले हे परिणाम अगदी लहान किंवा तात्पुरते आहे पण हा निष्कर्ष आश्वासक आहेत पण, ज्यांना हे बदल जाणवले त्यांच्यासाठी तो वैध परिणाम आहे. या अभ्यासामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणासंबधी सोशल मीडियावर सर्रासपणे पसरलेल्या चुकीच्या माहिती विरुध्द फायदेशीर ठरेल.
मासिक पाळीमध्ये झालेल्या छोटा बदल वैद्यकीयदृष्ट्या चिंतात्मक नाही. कारण इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ गायनॅकॉलॉजी अँड ऑब्स्टेट्रिक्सनुसार, आठ दिवसांपेक्षा कमी कालावधीतील कोणताही बदल सामान्य म्हणून वर्गीकृत केला जातो. मासिक पाळीचे चक्र साधारणपणे 28 दिवसांच्या कालावधीचे असते, पण हा काळ प्रत्येक महिलेसाठी वेगवेगळा असतो, किंवा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात हा कालावधी बदलू शकतो. तसेच तणावाच्या काळातही हा कालावधी बदलू शकतो.
या अभ्यासासाठी, शास्त्रज्ञांनी हार्मोनल गर्भनिरोधक वापरत नसलेल्या 18 ते 45 वयोगटातील महिलांचे प्रजनन ट्रॅकिंग (fertility tracking) अॅपवरून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले. संशोधनात सहभागी झालेल्यांपैकी सुमारे 2,400 जणींचे लसीकरण करण्यात आले होते त्यापैकी बहुतेक फायझर (55 टक्के), त्यानंतर मॉडर्ना (35 टक्के) आणि जॉन्सन अँड जॉन्सन (07 टक्के) होते. तसेच संशोधनात तुलना करण्यासाठी सुमारे 1,500 लसीकरण न झालेल्या महिलांचाही समावेश करण्यात आला होता.
लसीकरण केलेल्या गटातील महिलांचे, लसीकरणापूर्वीचे सलग तीन मासिक पाळी चक्र आणि लसीकरणानंतर आणखी तीन मासिक पाळीचे चक्रा किंवा मासिक पाळीदरम्यान झालेल्या लसीकरणासहआणखी तीन सलग मासिक पाळीचे चक्र अशी माहिती गोळा केली गेली होती. तर लसीकरण न झालेल्या माहिलांच्या सलग सहा मासिक पाळीचे चक्र अशी माहिती गोळा केली होती.
सरासरी, लसीकरण न केलेल्या गटाशी तुलना करताना, लसीकरणाचा पहिला डोसमुळे 0.64 दिवसांच्या आणि दुसऱ्या डोसमुळे 0.79 दिवसांच्या वाढीशी संबंधित माहितीचा वापर केला होता. या बदलामागे रोगप्रतिकारक शक्तीचा लसीकरणाला मिळालेला प्रतिसाद असू शकतो. "आम्हाला माहित आहे की, रोगप्रतिकारक प्रणाली आणि पुनरुत्पादक प्रणाली एकमेकांशी संबधीत आहेत," असे एडेलमन म्हणाले.
सुधारलेल्या रोगप्रतिकारक प्रणालीचा हायपोथॅलेमिक-पिट्युटरी-ओव्हेरियन अक्षावर परिणाम होऊ शकतो, ज्याला एडेलमन 'तुमचा मेंदू तुमच्या अंडाशयाशी कसा संपर्क साधतो' किंवा'तुमच्या गर्भाशयाशी कसा संपर्क, फक्त 'बॉडी क्लॉक' असे म्हणतात.
विशेषत:, साइटोकिन्स नावाच्या दाहक प्रथिनांचे (inflammatory proteins ) उत्पादन हे ज्या पद्धतीने अक्ष मासिक पाळीच्या वेळेचे नियमन करतो त्यात व्यत्यय आणत असल्याचे दिसते.
हे बदल सर्वात स्पष्ट दिसतात जेव्हा लसीकरण फॉलिक्युलरच्या सुरवातीच्या टप्प्यात(follicular phase) होते तेव्हा मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी सुरू रक्तस्त्राव सुरू होतो आणि जेव्हा ओव्हुलेशन(बीजकोश फुटून स्त्री जनन पेशी बाहेर येण्याची क्रिया) सुरू होते तेव्हा समाप्त होते.
खरेतर, दोन वेगवेगळ्या मासिक पाळीच्या चक्रांच्या विरूद्ध, एकाच मासिक पाळीच्या चक्रादरम्यान फायझर किंवा मॉडर्ना लसींचे दोन इंजेक्शन घेतलेल्या माहिलांच्या उपगटात, दोन दिवसांची सरासरी वाढ दिसून आली, परंतु परिणाम पुन्हा तात्पुरता दिसून येत होता.
टीमला आता आशा आहे की, ''लसीकरण झालेल्या महिलांमध्ये त्यानंतरच्या मासिक पाळीच्या चक्रांबद्दल अधिक माहिती गोळा करून, दीर्घकालीन परिणामांची पुष्टी केली जाईल आणि जागतिक स्तरावर अभ्यासाचा विस्तार केला जाईल जेणेकरून ते लसीच्या ब्रँडमधील परिणामांमध्ये फरक करू शकतील.''
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.