Working Hours : तुम्हीही ऑफिसमध्ये 8 तासांपेक्षा जास्त वेळ काम करताय का? मग हे वाचाच

८ तासांपेभा अधिक वेळ काम करणे तुमच्या आरोग्यासाठी किती धोक्याचे आहे ते?
Working Hours
Working Hoursesakal
Updated on

Working Hours : खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी कायम तणावात असल्याचं अनेक सर्वेक्षणातून दिसून आलंय. वेळेत काम देणे, डेडलाइनमध्ये परफॉर्म करणे आणि उत्तम रिझल्ट या सगळ्यांचा ताण कर्मचाऱ्यांवर असतो. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी कर्मचारी १०-१० तास काम करतात. पण तुम्हाला माहितीये का? ८ तासांपेभा अधिक वेळ काम करणे तुमच्या आरोग्यासाठी किती धोक्याचे आहे ते?

आठ तासांपेक्षा अधिक काम केल्यास उद्भवू शकतात हे आजार

हायपरटेंशन

हार्ट अटॅक

एन्झायटी

स्ट्रोक

डिप्रेशन

मसल्स पेन

बॅक पेन

स्लिप डिस्क

सर्वायल पेन

एकटेपणाची जाणीव

उद्गम हेल्थ केअरचे अनुभवी डॉक्टर राजेश गुप्ता यांच्या मते, जे लोक ८ तासांपेक्षा जास्त काळ शिफ्टमध्ये असतात त्यांच्या मनात एकटेपणाची भावना घर करू लागते. याचे मुख्य कारण असे की कामाच्या स्ट्रेसमुळे त्यांचा इतरांशी संवाद कमी होतो. संवादाच्या अभावामुळे ते कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसह जास्त वेळ घालवत नाहीत. आणि त्यांना एकटेपणा जाणवतो.

कामाचा स्ट्रेस

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, बहुतांश तरूण ऑफिसमध्ये ८ तासांपेक्षा जास्त वेळ शिफ्टमध्ये असतात. ज्यामुळे तरूणांमध्ये स्ट्रेसचे प्रमाण झपाट्याने वाढतेय. जपानसारख्या विकसित देशांबाबत बोलायचे झाल्यास इथे सामान्यत: तरूण आठवड्यात ४६ तास काम करतात. तर भारतात आठवड्याभरात कर्मचारी ५२ तास काम करतात.

तरूणांमध्ये चिडचिडेपणा

तरुणांच्या वागण्यात झपाट्याने वाढणाऱ्या नकारात्मकतेचे मुख्य कारण म्हणजे ते मानसिकदृष्ट्या खूप थकले असतात. त्यांच्याकडे शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्यासाठी वेळ नसतो किंवा ऑफिसनंतर त्यांच्याकडे फारशी ऊर्जा उरलेली नाही. अशा स्थितीत ते हळूहळू स्वत:मध्ये माघार घेऊ लागतात. जेव्हा ते त्यांचे विचार आणि मानसिक समस्या कोणाशीही सांगू शकत नाहीत, तेव्हा त्यांच्यामध्ये चिडचिड वाढू लागते आणि ते प्रत्येक विषयावर चिडचिड करू लागतात. ज्यामुळे त्यांचा ताण आणखी वाढतो.

Working Hours
Stress Free राहण्यासाठी वास्तू शास्त्रातील हे नियम येतील उपयोगी

क्षमतेपेक्षा जास्त काम

विशेषत: खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी आणि स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप दबावाचा सामना करावा लागतो. त्यामुळेच त्यांना त्यांच्या आवडीनिवडी आणि छंदांसाठी वेळ काढता येत नाही.

Working Hours
Work From Home करणाऱ्यांची प्रॉडक्टिव्हिटी इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत 18 टक्क्यांनी कमी, संशोधनातून आलं समोर

अशा प्रकारे स्वतःला रिलॅक्स करा

तुमची स्वप्ने पूर्ण करण्याच्या स्वइच्छेने जास्त काम करणे वाइट नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फक्त लक्षात ठेवा की तुमच्या कामाचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही.

या काही सोप्या ट्रिक्सने थकवा मिनिटांत दूर होईल

प्राणायाम, शवासन, कोमट दूध पिणे, आवडीचे संगीत ऐकणे इ. याशिवाय कुटुंबासमवेत १० मिनिटे जरी वेळ घालवलात तर ते पुरेसे आहे. यामुळे तुम्हाला सकारात्मकता जाणवेल. ही मानसिक ताकद तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करण्याची ऊर्जा देईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.