World Asthma Day 2024 : अस्थमाच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहेत ‘ही’ योगासने, दररोज सराव केल्याने मिळेल आराम

World Asthma Day 2024 : योगामध्ये अशी ताकद आहे की, जी तुम्हाला दम्यापासून आराम मिळवून देऊ शकते.
World Asthma Day 2024
World Asthma Day 2024esakal
Updated on

World Asthma Day 2024 : सध्याचे धकाधकीचे जीवन, वाढलेले प्रदूषण, कामाची धावपळ, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या समस्यांपैकीच एक असलेली समस्या म्हणजे अस्थमा किंवा दमा होय. भारतात सुमारे २ कोटी लोकांना दम्याचा त्रास आहे. या आजारात फुफ्फुसांवर परिणाम होतो आणि लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो.

जर या अस्थमा आजारावर वेळीच उपचार नाही घेतले तर हा दमा अटॅकचे रूप घेतो. जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. परंतु, उपचार घेण्यासोबतच तुम्ही यासाठी योगाची मदत देखील घेऊ शकता.

योगामध्ये अशी ताकद आहे की, जी तुम्हाला दम्यापासून आराम मिळवून देऊ शकते. आज ‘जागतिक अस्थमा दिन’ (World Asthma Day 2024) आहे. त्यानिमित्ताने आपण या योगासनांबद्दल जाणून घेऊयात. या योगासनांचा दररोज सराव केल्याने तुम्हाला अस्थमापासून आराम मिळू शकतो आणि तुमचे शरीर तंदूरूस्त राहण्यास मदत होऊ शकेल.

World Asthma Day 2024
World Asthma Day 2024 : अस्थमा अटॅक येण्याआधी शरीर देतं हे 5 संकेत, वेळीच करा हे काम, धोका होईल कमी

पवनमुक्तासन

पवनमुक्तासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. शिवाय, हे योगासन करायला ही अतिशय सोपे आहे. हे योगासन नियमितपणे केल्याने आपल्या शरीरातील फुफ्फुसे मजबूत होतात आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते. शिवाय, या योगासनाच्या सरावामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया देखील सुधारते आणि पाठीचा कणाही मजबूत होते. त्यामुळे, पाठदुखीच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते.

मकरासन

मकरासन हे योगासन करायला अतिशय सोपे आहे. हे योगासन सर्व वयोगटातील व्यक्ती करू शकतात. करायला अतिशय सोपा असलेले हे योगासन केल्याने फुफ्फुसाची क्षमता वाढते. यासोबतच पाठदुखी आणि गुडघेदुखीपासून आराम मिळतो. मकरासनाचा सराव केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि वजन कमी करण्यासही मदत होते.

कपालभाती

कपालभाती हा देखील प्राणायामचा एक प्रकार आहे. दररोज कपालभातीचा सराव केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. नियमितपणे कपालभातीचा सराव केल्याने संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह योग्य प्रकारे होण्यास मदत होते. तसेच, शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत राहते, चयापचय वाढते आणि फुफ्फुसे मजबूत होण्यास मदत होते.

World Asthma Day 2024
Yoga Tips : मानसिक आरोग्यासाठी अन् शारिरीक तंदूरूस्तीसाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, दररोज करा सराव

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.