World Blood Donor Day 2024: चला रक्ताची नाती जोडूया...! ३३ वर्षीय ॲड. अक्षय बाहेती यांचे तब्बल ५७ वेळा रक्तदान

World Blood Donor Day 2024: मानवी आयुष्यात रक्ताची नाती घट्ट असतात. पण, ही नाती केवळ जन्मानेच बांधली जातात, असे नाही; तर रक्ताची नाती निर्माणही करतात येतात.
World Blood Donor Day 2024:
World Blood Donor Day 2024: Sakal
Updated on

World Blood Donor Day 2024: मानवी आयुष्यात रक्ताची नाती घट्ट असतात. पण, ही नाती केवळ जन्मानेच बांधली जातात, असे नाही; तर रक्ताची नाती निर्माणही करतात येतात. शिवाय ती जन्माच्या नात्यासारखीच घट्टही ठेतात येतात, हेच शहरातील ३३ वर्षीय ॲड. अक्षय बाहेती यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. त्यांनी आतापर्यंत तब्बल ५७ वेळा रक्तदान केले. त्यामुळे या रुग्णांचे प्राण वाचले.

ॲड. बाहेती यांनी वर्ष २०१० मध्ये आयुष्यातील पहिले रक्तदान केले. तेव्हापासून त्यांनी आतापर्यंत तब्बल ५७ वेळा रक्तदान केले. यातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. वर्ष २००९ मध्ये ॲड. बाहेती यांच्या मित्राचा अपघात झाला होता. त्यावेळी रक्तासाठी करावी लागलेली धावपळ मनोमन रक्तदान करण्यासाठी प्रेरित करून गेली. त्यावेळी अक्षय हे १७ वर्षांचे होते.

त्यांनी २०१० पासून रक्तदानाला सुरवात केली. त्यांच्या या कार्याची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रक्तदानाच्या विक्रमाची नोंद झाली आहे. वयाच्या ३१ वर्षांपर्यंत ५० वेळा रक्तदान करण्याचा हा जागतिक विक्रम केला आहे. महाराष्ट्रातील हजारो रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध करून दिले. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत अवघ्या महाराष्ट्रात कोठेही रक्ताची गरज भासल्यास तेथे रक्त उपलब्ध करून देण्याची यंत्रणा उभारून हजारो रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.

World Blood Donor Day 2024:
World Blood Donor Day २०२४: रक्तदान कोण करू शकते? जाणून घ्या तज्ज्ञांकडून रक्तदानाशीसंबंधित महत्वाच्या गोष्टी

थॅलेसेमिया रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. थॅलेसेमिया रुग्णांना जेव्हा रक्ताची गरज भासते. तेव्हा अग्रेसर राहून त्या रुग्णाला रक्त उपलब्ध करून देण्यात पुढे असतात. शहरातील अपघातग्रस्तांसाठी कार्य केले; तसेच अपघातग्रस्तांना वेळेवर रुग्णालयात पोचवून शेकडो लोकांचा जीव वाचवण्याचे सामाजिक कार्य ते करीत आहेत.

या ठिकाणी नोंद

ॲड. बाहेती यांच्या या कार्याची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. एवढेच नाही तर १०० व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपकडून त्यांना पुरस्कार देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.