World Brain Day 2024 : मेंदूचे आरोग्य उत्तम हवंय? मग, तुमच्या रूटीनमध्ये ‘या’ गोष्टींचा करा समावेश

World Brain Day 2024: निरोगी मन आणि निरोगी शरीरासाठी मानसिक संतुलन असणे खूप गरजेचे आहे.
World Brain Day 2024
World Brain Day 2024esakal
Updated on

World Brain Day 2024 : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे, अतिशय महत्वाचे आहे. शारिरीक आरोग्यासोबतच आपले मानसिक आरोग्य तितकेच फायदेशीर आहे. मन हे मेंदूचे सार आहे आणि म्हणूनच निरोगी मन आणि निरोगी शरीरासाठी मानसिक संतुलन असणे खूप गरजेचे आहे.

मेंदूचे आरोग्य उत्तम प्रकारे राखण्यासाठी दरवर्षी जगभरात २२ जुलैला ‘जागतिक मेंदू दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजच्या दिवशी मेंदूचे विकार आणि मेंदूचे आरोग्य कसे निरोगी ठेवता येईल याबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, हा या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. आज जागतिक मेंदू दिनानिमित्त आपण मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्यात? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

World Brain Day 2024
World Brain Day : मुलांची बुध्द्धी होईल तल्लख! त्यांच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश...

मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी रोज व्यायाम करा

मेंदू निरोगी आणि सक्रिय ठेवण्यासाठी व्यायाम करणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही आठवड्यातून ४-५ दिवस केवळ १५-२० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे, तुमची स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होईल. यासोबतच तणाव, नैराश्यासारख्या समस्या दूर राहू शकतील.

मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी धूम्रपान करू नका

धूम्रपान करणे हे आपल्या शारिरीक अन् मानसिक आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. एका संशोधनानुसार, सिगारेट ओढल्याने मेंदूचा कॉर्टेक्सचा भाग पातळ होतो. मेंदूतील हा कॉर्टेक्स भाग मेंदूच्या बाह्य पृष्ठभागाची निर्मिती करतो.

त्यामुळे, हा भाग अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील असतो. त्यामुळे, हा भाग जर धूम्रपानामुळे पातळ झाला तर, लोकांच्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे, धूम्रपानाची वाईट सवय लवकर सोडा.

पुरेशी झोप आवश्यक

आपले मानसिक आणि शारिरीक आरोग्य जपण्यासाठी पुरेशी झोप घेणे अतिशय महत्वाचे आहे. झोप नीट झाली नाही तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढणे, मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब यांसारखे आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे, रोज किमान ७-८ तासांची झोप आवश्यक आहे.

World Brain Day 2024
National Mango Day 2024: चमकदार त्वचेसाठी घरीच बनवा आंब्यापासून फेस पॅक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.