आज जगभरात 'जागतिक मेंदू दिन' साजरा केला जात आहे. मेंदू हा मानवी शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. मेंदूचे हे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी 22 जुलै रोजी जागतिक मेंदू दिन साजरा केला जातो. मेंदूचे आरोग्य आणि न्यूरोलॉजिकल विकारांबद्दल जागरुकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. निरोगी राहण्यासाठी, योग्य आहार आणि जीवनशैलीचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे आपल्याला आजारांपासून दूर राहण्यासोबतच मानसिक विकासही होतो. डॉकटर म्हणतात, लहानपणीच मुलांच्या मेंदूचा विकास होतो, त्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच संतुलित आहार दिला पाहिजे.
मुलाला हुशार बनवण्यासाठी त्याच्या आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. आजकाल बहुतेक मुले प्रोसेस्ड आणि जंक फूड खाऊ लागली आहेत. याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आरोग्यावर तर होतोच पण मानसिक विकासावरही परिणाम होतो. चला जाणून घेऊया तुमच्या मुलांच्या आहारात कोणत्या गोष्टी द्याव्यात.
प्रोटीन व्यतिरिक्त अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी आणि बी सह अनेक पोषक घटक असतात. यामुळे मुलांचे शारीरिक आरोग्य तर चांगले राहतेच, पण त्याचे ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि फॉलिक ॲसिड मुलांच्या मानसिक विकासासाठीही फायदेशीर असते.
मुलांचा रोज ड्राय फ्रुट्स खायला द्या. अक्रोड आणि बदाम विशेषतः खूप फायदेशीर मानले जातात. मुलांना हुशार बनवण्यासाठी त्यांना ओट्स किंवा दुधात मिसळून ड्रायफ्रुट्स दिले जाऊ शकतात.
जीवनसत्त्वे, खनिजांसह अनेक पोषक घटक दुधामध्ये असतात. दुधात आढळणारे कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे मुलाच्या विकासात मदत करतात. म्हणून, आपल्या मुलाला दररोज एक ग्लास दूध द्या.
भाज्या आपल्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक पुरवतात. हे खाल्ल्याने शरीर निरोगी राहते आणि रोगांशी लढण्याची क्षमता प्राप्त होते. रोज भाज्या खाल्ल्याने मेंदूचे आरोग्यही सुधारते. सिमला मिरची, गाजर, ब्रोकोली, पालक या भाज्याही मानसिक विकासासाठी फायदेशीर आहेत.