World Cancer Day 2024 : लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या ५ वर्षांत कर्करोगाने पीडित मुलांची संख्या ३२ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे पालकांनी बाहेरून येणारे जंक फूड टाळावे आणि मुलांना खेळ खेळण्यापासून रोखू नये, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
देशात दरवर्षी १३ लाख लोकांमध्ये कर्करोगाचे निदान होते. येत्या ५ वर्षात ही संख्या दुप्पट होईल, असेही टाटा रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी सांगितले. लहान मुले देखील या आजारापासून वाचले नाहीत.
टाटा मेमोरियल रुग्णालयाचे शैक्षणिक संचालक आणि बाल कर्करोगतज्ज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली यांनी सांगितले की, दर दोन वर्षांनी रुग्णांमध्ये १० टक्क्यांनी वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रौढांमध्येही कर्करोगाचे प्रमाण दर दोन वर्षांनी वाढत आहे.
एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या बीएमटी फिजिशियन डॉ. श्वेता बन्सल यांनी सांगितले की, चाचणीमध्ये हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्स कमी असल्यास. पांढऱ्या रक्तपेशींमध्ये वाढ किंवा घट होत असल्यास, त्वरित ऑन्कोलॉजिस्टशी संपर्क साधा.
शरीराच्या कोणत्याही भागात वेदना होत नसल्या तरीही गाफील राहू नका. डोकेदुखी, उलट्या, ताप ही ब्रेन ट्यूमरची लक्षणे आहेत. अनेक वेळा कॅन्सर चाचणीचे नाव ऐकून पालक माघार घेतात, हे अजिबात करू नका, जर रोग वेळेवर ओळखला गेला, म्हणजे स्टेज १ आणि २ मध्ये, तो बरा होण्याची शक्यता जास्त असते, असे त्यांनी सांगितले.
१० वर्षांपूर्वी, मुलांमध्ये बरे होण्याचे प्रमाण कमी होते, परंतु आता वेळेवर उपचार सुरू झाल्यामुळे बरे होण्याचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे, असे कोकिलाबेन हॉस्पिटलमधील डॉ शंतनू सेन यांनी सांगितले.
टाटा रुग्णालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये १८ वर्षाखालील १९९४ मुले उपचारासाठी परळ आणि खारघर येथील रुग्णालयात दाखल झाली.
२०२३ मध्ये दोन्ही रुग्णालयांमध्ये नवीन रुग्णांची संख्या २६३० आहे. यावरून लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
ब्रिटनमधील अभ्यासानुसार, मुलांना मातीत खेळ खेळण्यापासून रोखू नये. जेणेकरून त्यांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते. लहान मुलांमध्ये कॅन्सर होण्यामागे काही खास कारण नाही, पण जंक फूड टाळले पाहिजे , चांगली झोप खूप महत्त्वाची आहे, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.