World Cancer Day : पिझ्झा, कँडी आणि आईस्क्रीममुळे सुद्धा होतोय कॅन्सर ! अशी घ्या खबरदारी

संपूर्ण जगभरात जागतिक कर्करोग दिन साजरा
World Cancer Day
World Cancer Dayesakal
Updated on

World Cancer Day : आज 4 फेब्रुवारी.. संपूर्ण जगभरात जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातोय. सध्याच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात बरीच प्रगती झाली असून, त्यामुळे विविध प्रकारच्या कॅन्सरवर वेळेवर उपचार घेऊन कॅन्सरपासून मुक्ती मिळणे शक्य झाले असले तरी, कॅन्सरचे वाढते प्रमाण केवळ भारतातच नाही तर जगभरातील रुग्ण हा चिंतेचा विषय आहे. याचं कर्करोगाच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन पाळला जातो.

World Cancer Day
Travel Tips : "व्हिजा मिळवून देणारे देव" परदेशी जाणारे लोक या मंदिरात करतात नवस

कर्करोगाचा धोका कसा वाढतो

भारतात सर्वात जास्त गतीने वाढणारा हा आजार आहे. कर्करोग होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैलीच याला कारणीभूत आहे.

नॉर्मल अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड आरोग्यासाठी धोकादायक...

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नॉर्मल अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो. कॅन्सर रिसर्च युनायटेड किंगडम आणि वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड यांनी केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. हॉट डॉग्स, चिप्स, सोडा आणि आइस्क्रीम अशा अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचे सतत सेवन केल्याने लठ्ठपणा आणि हाय कोलेस्ट्रॉलचे गंभीर परिणाम होतात, तसेच कर्करोगाचा धोका वाढतो असा दावा करण्यात आला आहे.

World Cancer Day
Travel Blog : वर्दळीपासून दूर असलेल्या या गावात राहतात कौरव पांडवांचे वंशज!

अल्ट्रा प्रोसेस्ड फूड जास्त खाल्ल्याने गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. जे लोक जास्त जंक फूड खातात त्यांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका 30 टक्के जास्त असतो. संशोधकांच्या मते, प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने कोणत्याही कर्करोगाचा धोका 2 टक्के आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका 19 टक्क्यांनी वाढू शकतो. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये फ्रेंच फ्राईज, सोडा, स्टोअरमधून विकत घेतलेल्या कुकीज, केक, कँडी, डोनट्स, आइस्क्रीम, सॉस आणि पिझ्झा यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. मात्र, आजही कॅन्सरबद्दल लोकांमध्ये जागरूकता नसल्याचं दिसून आलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()