हेपेटाइटिस (Hepatitis) हा यकृत या अवयवाशी संबंधित गंभीर आजार आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे होणा-या या आजारामुळे यकृताशी संबंधित समस्या निर्माण होतात, जसे की यकृतामध्ये सूज येण्यापासून ते यकृताचा कर्करोग होण्यापर्यंतही समस्या निर्माण होऊ शकतात.
हेपेटाइटिस आणि यकृताशी संबंधित आजारांबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक हेपेटाइटिस दिवस (World Hepatitis Day) साजरा केला जातो. जाणून घेऊया जागतिक हेपेटाइटिस दिनाचे महत्त्व (History of World Hepatitis Day) आणि या वर्षीच्या थीमबद्दलची माहिती.
नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. बारूक ब्लमबर्ग यांनी हेपेटाइटिस बी विषाणू (HBV) चा शोध लावल्यानंतर, या व्हायरसवर उपचार करण्यासाठी निदान चाचणी आणि लस देखील विकसित करण्यात आली.
डॉ. ब्लमबर्ग यांनी हेपेटाइटिस या आजारावर संशोधन केल्याच्या सन्मानार्थ त्यांच्या वाढदिवशी म्हणजेच दरवर्षी 28 जुलै रोजी 'वर्ल्ड हेपेटाइटिस डे' साजरा केला होता. जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रथमच 2008 साली जागतिक हेपेटाइटिस दिवस साजरा करण्यात आला होता.
जागरुकतेचा अभाव असल्याने जगभरातील लोक हेपेटाइटिस या आजाराला बळी पडतात. या गंभीर आजारामुळे यकृताशी संबंधित समस्या निर्माण होऊन मृत्यू होण्याचा धोका आहे. हेच धोके टाळण्यासाठी जागतिक हेपेटाइटिस दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करून लोकांना या आजाराबाबत जागरूक केले जाते.
'एक जीवन एक यकृत' ही वर्ल्ड हेपेटाइटिस डेची यंदाची (वर्ष 2023) थीम आहे. यंदा जगभरात हेपेटाइटिस व्हायरसप्रति जागरूकता वाढवणे, रोगाची लक्षणे कशी ओळखावीत आणि आजारातून प्रकृती सुधारण्यासाठी औषधोपचार करण्यास प्रोत्साहन देण्याकरिता आवश्यक मानकांचा विस्तार करण्यावर भर दिला जाईल. जेणेकरून वर्ष 2030पर्यंत हेपेटाइटिस आजाराचा समूळ नाश केला जाऊ शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.