World Liver Day : दारू न पिणाऱ्या लोकांचंही होऊ शकतं लिव्हर खराब, 'या' चुका कधीही करू नका...

असे अनेक कारणे आहेत ज्यामुळे तुमचं लिव्हर डॅमेज होऊ शकतं.
World Liver Day
World Liver Daysakal
Updated on

World Liver Day : आपण सर्वांनी ऐकलंय, वाचलंय की मद्यपान हे लिव्हरच्या आरोग्यासाठी उत्तम नाही. पण तुम्हाला माहिती आहे का दारू न पिणाऱ्या लोकांचंही लिव्हर खराब होऊ शकतं? हो हे खरंय. फक्त मद्यपानच नाही तर इतर असे अनेक कारणे आहेत ज्यामुळे तुमचं लिव्हर डॅमेज होऊ शकतं.

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजार मद्यपान न करता चुकीच्या लाईफस्टाईलमुळे होऊ शकतो. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (World Liver Day how Can your liver be damaged without alcohol )

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजाराचे मुख्य लक्षण हे लठ्ठपणा, इंसुलिन रेजिस्टेंस ज्यामध्ये आपल्या शरीराचे सेल्स हॉर्मोन इंसुलिनच्या तुलनेत शुगर बनवत नाही. हाय ब्लड शुगर लेवल आणि रक्तात फॅटची हाय लेवल, ट्रांस फॅट मागील एक दशकापासून म्हणजेच 10-15 वर्षात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर आजार वाढवत आहे.

सुरवातीला हे आजार पश्चिमी देशांमध्ये जास्त दिसायचे मात्र आता लोकांच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आता हे भारतातील टॉप आजारांमध्ये गणले जाते.

World Liver Day
Liver Day : यकृत प्रत्यारोपणाची गरज नेमकी केव्हा भासते ?

जर तुमचे जास्त वजन असतील तर तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता जास्तआहे. जसा जसा लठ्ठपणा वाढतो, तसं तसं लिव्हरमध्ये फॅट वाढू लागतं. काही लोक लठ्ठ नसतात तरीसुद्धा त्यांना या आजाराचा सामना करावा लागतोय ज्याला लीन फॅटी लिव्हर आजार म्हणतात.

हा एक मेटाबॉलिक फॅक्टर आहे जो कोलेस्ट्रॉल, हायपरटेंशन आणि ट्रायग्लिसराइड्समुळे होतो. या शिवाय डायबिटीजमुळेही हा आजार होऊ शकतो. जर तुम्ही अॅक्टीव्ह नसाल तर तुमच्या बीएमआय कडे लक्ष देणे, गरजेचे आहे.

World Liver Day
Healthy Foods : ही फळे म्हणजे रक्त बनवण्याचे मशीन ! कोणती जाणून घ्या

'नॉन-अल्कोहोलिक फॅटीलिव्हर आजार होण्यामागील कारण हे लठ्ठपणा आणि डायबिटीजवर कंट्रोल नसणे होय. याशिवाय खूप जास्त कार्बोहाइड्रेटचे सेवन, चुकीचा आहार, जंक फूड, यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.

याशिवाय दररोज व्यायम न करणे, ऑनलाईन वर्क, चुकीची लाईफस्टाईल यामुळेही या आजाराचा धोका वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.