World Lung Cancer Day 2024 : धूम्रपानाचा फॅशन म्हणून वापर; मिळेल कर्करोगाला निमंत्रण

World Lung Cancer Day 2024 : ९० टक्के फुप्फुसाचा कॅन्सर हा धूम्रपानामुळेच होतो.
World Lung Cancer Day 2024
World Lung Cancer Day 2024 esakal
Updated on

World Lung Cancer Day 2024 : जगाच्या पाठीवर सर्वत्र वायू प्रदूषणाचा विळखा वाढत आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रदूषित वातावरणाचा सामना करावा लागतोय. हा विळखा इतका घट्ट आहे की, देशात दर आठव्या मिनिटांत एकाला फुप्फुसासा कर्करोग विळख्यात घेतो.

सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि हुक्का यामुळे धूम्रपानाचा विळखा वाढत आहे. ९० टक्के फुप्फुसाचा कॅन्सर हा धूम्रपानामुळेच होतो. या जीवघेण्या फुप्फुसाच्या कॅन्सरचे वेळीच निदान होत नसल्याने परिस्थिती चिंताजनक बनत आहे. दरवर्षी नवीन निदान होणाऱ्या एकूण कॅन्सरग्रस्तांपैकी ७ टक्के अर्थात कॅन्सर फुप्फुसांचे ७० ते ९० हजार नवीन व्यक्ती आढळून येतात.

विशेष म्हणजे फुप्फुसांचा कॅन्सर हरियाना, दिल्ली, चेन्नई या राज्यांमध्ये वेगाने वाढतोय. तसेच महाराष्ट्र पहिल्या पाच क्रमांकाच्या पंक्तीत येतोय. एकट्या फुप्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण हे १४ टक्के नोंदविले गेले. धूम्रपानामुळे ८० ते ९० टक्के रुग्णांना फुप्फुसांचा कॅन्सर होतो. यानंतरही आपल्याकडे तब्बल २८.६ टक्के जनता तंबाखू व तत्सम व्यसनाला जवळ करते. यात पुरुषांचे प्रमाण ४२.४ टक्के तर महिलांचे प्रमाण १४.०० टक्के आहे.

World Lung Cancer Day 2024
World Lung Cancer Day 2024: 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकतो फुफ्फुसाच्या कर्करोग, वेळीच घ्या आरोग्याची काळजी

अशी आहेत कारणे

  • आनुवंशिक

  • वाढते प्रदूषण

  • प्रदूषित हवेचा

  • सततचा सहवास

  • दीर्घकालीन

  • फुप्फुसाचे विकार

ही आहेत लक्षणे

  • दीर्घकाळ खोकला

  • छातीत कफ असणे

  • खोकला, थुंकीद्वारे रक्त

  • श्वास घेताना त्रास होणे

  • चेहरा व आवाजात

  •  बदल होणे

अलीकडे फॅशन म्हणून धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. धूम्रपान, प्रदूषण, किरणोत्सर्ग हे फुप्फुसाच्या कॅन्सरचे प्रमुख कारण आहे. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनानेदेखील फुप्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. यामुळे धूम्रपान तातडीने सोडावे. पूर्वनिदानासाठी लक्षणे आढळताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. इबस ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रियेद्वारे पूर्वनिदान आणि स्टेज माहिती करून घेणे शक्य आहे. योग्य उपचार आणि पूर्वनिदानाद्वारे फुप्फुसांचा कॅन्सर बरा होऊ शकतो.

- डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनविकार तज्ज्ञ, नागपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.