World Menopause Day: दरवर्षी १८ ऑक्टोबर ला जागतिक रजोनिवृत्त दिन साजरा केला जातो. सर्व महिलांना जीवनातील टप्प्या दरम्यान रजोनिवृत्तीचा सामना करावा लागत असला तरी अनेक महिलांना रजोनिवृत्तीमुळे त्यांचे आरोग्य व स्वास्थ्यावर होणाऱ्या परिणामांबाबत माहित नाही.
या स्थितीबाबत फारशी चर्चा करण्यात आलेली नाही, ज्यामुळे महिलांना जीवनातील या भावी टप्प्यासाठी सुसज्ज राहणे अवघड होते. रजोनिवृत्तीमुळे विविध प्रकारचे बदल होऊ शकतात. काही महिलांना पीरियडदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळण्याचे वाटू शकते, आत्म-शोधाची भावना जागृत होऊ शकते आणि पुढे काय घडणार याबाबत उत्सुकता निर्माण होऊ शकते. पण या टप्प्यादरम्यान महिलांच्या शरीरात बदल होण्यासोबत इस्ट्रोजेन पातळ्यांमध्ये घट होते हे लक्षात असणे देखील महत्त्वाचे आहे.