World Mental Health Day : तुम्ही Over Thinking करतात का? 'हे' उपाय करून बघा

खूप जास्त विचार करणे हा देखिल एक प्रकारचा मानसिक आजारच आहे.
Over Thinking
Over Thinking esakal
Updated on

World Mental Health Day : माणूस विचार करू शकतो म्हणूनच तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असतो. असे म्हणतात प्रत्येक माणूस आपल्या विचारानेच आपलं आयुष्य घडवत असतो. द सिक्रेट हे पूस्तक देखिल मानवी विचार प्रक्रियेबाबतच सांगतो. तुम्ही जो विचार करता ते तुमच्या आयुष्यात परतते. म्हणूनच आपण नेहमी चांगल्या दिशेने विचार करायला हवा असं सांगितलं जातं.

Over Thinking
Mental Health Day : मानसिक आरोग्यासाठी मोबाईलपासून 'ब्रेकअप' आवश्यक

एका संशोधनानुसार माणसाला 24 तासात 70 हजारपेक्षा जास्त विचार येतात. हे सामान्य विचार करणा-यांसाठी. मात्र बदलती जीवन शैली Life Style मुळे आपल्या विचाराच्या कक्षा रुंदावल्या आहेत. खूप जास्त विचार करणे हा देखिल एक प्रकारचा मानसिक आजारच आहे.

Over Thinking
World Mental Health Day : मानसिक सुदृढतेसाठी साथ संवादाची

वाचन करणे, जास्त वेळ मोबाईल वापरणे, सोशल मीडियावर सतत सक्रिय राहणे आणि अन्य अनेक कारणांमुळे अनेकांना खूप जास्त विचार करण्याची सवय जडते. अशा माणसांना एक मिनिट देखिल शांत राहता येत नाही.

Over Thinking
Mental Health: टीनेजमधल्या 'या' चुकीच्या सवयींमुळे येईल डिप्रेशन; मुलांनो, वेळीच सावध व्हा!

यावर उपाय म्हणून मग योगासन प्राणायाम या Life style कडे हे लोक वळतात. मात्र एवढे करूनही अनेकांची खूप जास्त विचार करण्याची सवय जात नाही. योगासन प्राणायाम यांच्यामुळे थोडावेळ साठी विचारांची गती कमी होते.

Over Thinking
Better Mental Health : उत्तम मानसिक आरोग्यासाठी 'हे' पदार्थ खा

मात्र, अनेक वेळा आपल्या आजकालच्या फास्ट फॉरवर्ड Life style मुळे योग-प्राणायामाच्या सवयीत देखिल सातत्य राहत नाही. परिणामी जास्त विचार करणे, अतिरिक्त विचार करणे हा आजार काही जात नाही.

Over Thinking
Mental Health : पुरुषही रडू शकतो, त्यालाही असते मानसिक आधाराची गरज!

हे साधे उपाय करून पाहा

श्वासावर लक्ष द्या

दर दोन तासातून 5 मिनिटे स्वतःच्या श्वासावर लक्ष द्या. घड्याळात वेळ लावून किंवा मोबाईममध्ये अलार्म लावून मोजून 5 मिनिटे आपल्या श्वासावर लक्ष द्या. लक्षात घ्या तुम्हाला प्राणायाम करायचा नाही. फक्त श्वासावर लक्ष द्यायचे आहे. डोळे मिटून तुम्हाला फक्त एवढे लक्ष द्यायचे आहे की श्वास कसा येतो आणि कसा जातो.

श्वास मोजणे

तुम्हाला श्वासावर लक्ष केंद्रित करता येत नसेल तर श्वास मोजणे हा एक चांगला प्रभावी उपाय आहे. विशेष करून रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद करून श्वास उलटे मोजायचे आहे. म्हणजे 100, 99, 98 असे करत एक पर्यंत यायचे. किमान 5 मिनिटे रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा. दररोज केल्याने निश्चितच विचारांची गती कमी होईल.

‘ज्ञान मुद्रा’ करा

मुद्रा रहस्यात देण्यात आला आहे. मुद्रा विज्ञान तुम्हाला तुमचे विचार नियंत्रणात आणण्यासाठी खूप मदत करते. तुम्ही खूप जास्त विचार करत असाल तर तुम्ही ‘ज्ञान मुद्रा’ करा. ज्ञान मुद्रेचे इतर अनेक लाभ होतात. मात्र विचारांची गती कमी करण्यासाठी ध्यान धारणा करण्यासाठी या मुद्रेचा मोठा उपयोग होतो. शिवाय तुम्ही हे अगदी कधीही करू शकता. फक्त जेवणानंतर लावू नये. दररोज 48 मिनिटे दोन्ही हाताने ज्ञान मुद्रा लावल्याने निश्चितच विचारांची गती कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.