World Mental Health Day 2024: दरवर्षी 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' 10 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. जागतिक मानसिक आरोग्य महासंघाच्या पुढाकाराने जागतिक मानसिक आरोग्य दिन 1992 मध्ये साजरा करण्यास सुरूवात झाली. लोकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तुम्हाला २१ दिवसांमध्ये मानसिक आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेऊ शकता. यासाठी काय करावे आणि कोणत्या पदार्थांचे सेवन करावे हे जाणून घेऊया.
दिवसाची सुरूवात आरोग्यदायी आणि पोषक पदार्थांनी करावी. आहारात कडधान्य,भाज्या, पालेभाज्या, फळं यासारख्या पदार्थांचा सामावेश करावा. यात असलेले ओमेगा फॅटी अॅसिड, प्रथिने मानसिक आरोग्य निरोगी ठेवते.
योगा किंवा व्यायम करणे आरोग्यदायी असते. यामुळे शरीर निरोगी तसेच स्नायू लवचिक राहते. मानसिकआरोग्य निरोगी ठेवायेच असेल तर साधा सोपे योगा करू शकता. यात प्राणायम, सुर्यनसम्कार करू शकता. तसेच तुम्ही ध्यान देखील करू शकता
मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे असते. रोज ७ ते ८ तासाची झोप घेणे गरजेची असते. रात्री झोपताना मोबाईल पाहू नका. जास्तवेळ जागरण करू नका. तसेच लवकर झोपल्यास सकाळी लवकर उठावे.
सतत काम करून आणि एकच दिनचर्याचे पालन केल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत किंवा आवडत्या व्यक्तीसोबत फिरायला जावे. यामुळे तणाव कमी होईल आणि मानसिक आरोग्य निरोगी राहील.
मोबाइल सध्या आवश्यक वस्तू बनवला आहे. आपली सर्व कामे मोबाईल होतात. तसेच एक मनोरंजनाचे साधन झाले आहे. सतत मोबाइल वापरल्याने ताण येऊन मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. यामुळे एक दिवस मोबाइलपासून दूर राहावे.
ओट्स
बीन्स
सोया
पालेभाज्या
टमाटर
केळी
सुकामेवा
जर तुम्हाला निरोगी आयुष्य हवे असेल तर पोषक पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसेच नियमितपणे योगा करावा. यामुळे मानसिक आरोग्य चांगेल राहते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.