World Mosquito Day: दरवर्षी २० ऑगस्ट हा दिवस जागतिक डास दिन म्हणून साजरा केला जातो. डास आणि त्यांच्यापासून होणाऱ्या आजारांबद्दल जागरूकता पसरवणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
सध्या अनेक ठिकाणी ऊन तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. यामुळे चिकनगुनिया, डेंग्यु यासारखे आजार डोकं वर काढतात.
मुलांचे डासांपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. मुलांची काळजी न घेतल्यास डासांमुळे मुले आजारी पडू शकता. डासांपासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी पुढील काही सोपे उपाय करू शकता.