World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024 : भारतात तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी १.३५ दशलक्ष मृत्यू प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या होतात.
World No Tobacco Day 2024
World No Tobacco Day 2024esakal
Updated on

World No Tobacco Day 2024 : जगभरात वेगाने वाढणाऱ्या अनेक गंभीर आजारांचे प्रमुख कारण म्हणून तंबाखूजन्य पदार्थांकडे पाहिले जाते. तंबाखूच्या सेवनामुळे विविध प्रकारचे गंभीर आजार होतात. युनायटेड स्टेट्समध्ये दरवर्षी ५ दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू हा धूम्रपान केल्याने होतो. भारतात देखील हीच स्थिती आहे. भारतात तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी १.३५ दशलक्ष मृत्यू प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या होतात.

भारताच्या दृष्टिकोनातून ही झपाट्याने वाढणारी समस्या आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने कर्करोग, फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार आणि पक्षाघात यांसारखे गंभीर आजार होतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते मागील काही वर्षांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, हे थांबवणे अतिशय आवश्यक आहे.

हा धोका लक्षात घेऊन दरवर्षी ३१ मे हा दिवस ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ म्हणून साजरा केला जातो. लोकांना तंबाखूमुळे उद्भवणाऱ्या गंभीर धोक्यांची जाणीव करून देणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. आज जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण तंबाखूमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

World No Tobacco Day 2024
World No-Tobacco Day : तंबाखूमुळे दरवर्षी नऊ लाख जणांचा मृत्यू

मधुमेहाचा धोका

जे लोक नियमितपणे धूम्रपान करतात त्यांना इतरांच्या तुलनेत मधुमेहाचा धोका हा जास्त प्रमाणात असतो. धूम्रपानाचा थेट परिणाम हा इन्सुलिनवर होतो. त्यामुळे, इन्सुलिनच्या प्रतिकाराचा धोका वाढतो. त्यामुळे, ज्या लोकांना आधीच मधुमेह आहे, त्यांना आरोग्याच्या समस्या अधिक प्रमाणात भेडसावण्याची शक्यता असते. त्यामुळे, धूम्रपान अजिबात करू नका.

फुफ्फुसाच्या आजारांची समस्या वाढते

फुफ्फुसे हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. धूम्रपान केल्याने त्याचा थेट परिणाम हा आपल्या फुफ्फुसांवर होतो. त्यामुळे, फुफ्फुसाला धोका निर्माण होतो. धूम्रपानाचा धूर किंवा तंबाखूजन्य पदार्थांमधील कण हे फुफ्फुसातील लहान हवेच्या पिशव्यांना (एल्वियोलीला) नुकसान पोहचवते. ज्यामुळे, फुफ्फुसाचा आजार होऊ शकतो.

दरम्यान, फुफ्फुसाच्या कर्करोगांमध्ये बहुतांश घटनांमध्ये धूम्रपान हे प्रमुख कारण म्हणून समोर आले आहे. त्यामुळे, धूम्रपान करणे हे आरोग्यासाठी किती घातक आहे? हे दिसून येते.

हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीत आजार

धूम्रपानामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीला हानी पोहचण्याचा धोका असतो. तंबाखूमध्ये आढळून येणाऱ्या निकोटीनमुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे, रक्तप्रवाहावर गंभीर परिणाम होतो. याशिवाय, धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांवर रक्तदाब ही वाढतो. ज्यामुळे, रक्तवाहिन्या कमकुवत होतात आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. धूम्रपानामुळे हृदयविकाराच धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते.

World No Tobacco Day 2024
Heart Attack Symptoms : हृदयविकारामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले; सर्वाधिक 2 हजार 430 रुग्णांचा मृत्यू, तापाच्या साथींचाही प्रभाव

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.