World Organ Donation Day : कोण करू शकतं अवयव दान? जाणून घ्या नियम

अवयव दानाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १३ ऑगस्टला अवयव दिन साजरा केला जातो.
World Organ Donation Day
World Organ Donation Dayesakal
Updated on

Rules For Organ Donation In Marathi :

अवयव दानाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १३ ऑगस्टला अवयव दिन साजरा केला जातो. नॅशनल हेल्थ पोर्टलनुसार भारतात दरवर्षी ५ लाख लोक अवयवांची उपलब्धता न झाल्यामुळे मरतात. त्यापैकी २ लाख लोकांचा मृत्यू लीव्हर न मिळाल्याने होतो. एक व्यक्ती आपले अवयव दान करून एकाच वेळी ८ लोकांना जीवनदान देऊ शकते.

अवयव प्रत्यारोपण व दानाची सुरुवात कधी झाली?

प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे एका व्यक्तीचे अवयव दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचवून अवयव प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. १९५४ मध्ये अमेरिकेत पहिले यशस्वी अवयव प्रत्यारोपण करण्यात आले. डॉक्टर जोसेफ मरे यांना १९९० मध्ये रोनाल्ड आणि रिचर्ड हेरिक या जुळ्या भावांमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीपणे केल्याबद्दल फिजिओलॉजी आणि मेडिसिनमधील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

अवयवदानाचे प्रकार

  • जिवंतपणी अवयवदान

  • मृत्यूनंतर अवयवदान

World Organ Donation Day
Organ Donation : आईच्या निधनानंतर मुलीनं घेतला मोठा निर्णय; 'या' कृतीमुळं होऊ लागलंय कौतुक

जागरुकतेचा अभाव

आजही लोकांमध्ये अवयव दानाबाबत जागरुकतेचा अभाव आहे. अनेक स्वयंसेवी संस्था आणि सार्वजनिक संस्था याबाबत जनजागृती करत आहेत. पण समजुती व रुढींमुळे लोकांमध्ये अवयव दानाचा उदात्त हेतून दिसून येत नाही. नॅशनल हेल्थ पोर्टलच्या मते स्पेनमध्ये ३५ टक्के तर अमेरीकेत २६ च्या तुलनेत देशात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे केवळ ०.६५ टक्के अवयव दान केले जाते.

अवयव दान कोण करू शकतं?

  • दान करणारी व्यक्ती निरोगी असावी.

  • ब्रेन डेड व्यक्तीला एचआयव्ही, कँसर, मधुमेह, किडनी आणि हृदयाचे आजार नसावेत.

  • ब्रेन डेड झाल्यावर हृदयाची धडधड चालू असेपर्यंत अवयव दान करू शकतात.

  • डोक्याला दुखापत, स्ट्रोक, ब्रेन ट्यूमर, मेंदूला हानी पोहचवणारा कोणताही आजार असे लोक डोनर बनू शकतात.

  • जन्मापासून वयाच्या ६५ वर्षापर्यंत अवयव दान केले जाऊ शकते.

World Organ Donation Day
Organ Donation : मृत्यूनंतरही क्रितीची किर्ती जगभर पसरली, १४ वर्षाच्या पोरीने १० जणांना दिल जीवनदान!

कोण अवयव दान करू शकत नाही

  • कोणताही आजारी व्यक्ती अवयवदान करू शकत नाही,

  • एचआयव्ही, कर्करोग आणि अशा गंभीर संसर्गासारख्या जलद पसरणाऱ्या आजारांनी ग्रस्त असलेले लोक अवयवदान करू शकत नाही.

  • जिवंत अवयव दान करण्यासाठी मधुमेह, मूत्रपिंड किंवा हृदयरोग, कर्करोग, एचआयव्ही इत्यादी लोकांना बाहेर ठेवले जाते.

अवयव दानासाठी कुठे संपर्क साधावा?

  • www.rnos.org, www.notto.nic.in किंवा mohanfoundation.org रजिस्टर करु शकता किंवा टोल फ्री नंबर 1800114770, 18001037100 वर संपर्क करु शकता.

  • रजिस्ट्रेशननंतर जारी कार्डची माहिती कुटुंबियांना द्यावी. जेणे करुन ते ब्रेनडेड झाल्यास हॉस्पिटलला माहिती देऊ शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.