World Stroke Day : वारंवार उचक्या येणं हलक्यात घेऊ नका, असू शकतं या गंभीर आजाराचं लक्षण

मात्र तुम्हाला हे माहितीये का की महिलांमध्ये पुरुषांपेक्षा स्ट्रोकची लक्षणे वेगळी असू शकतात
World Stroke Day
World Stroke Dayesakal
Updated on

World Stroke Day : दरवर्षी २९ ऑक्टोबरला वर्ल्ड स्ट्रोक डे साजरा केला जातो. मेंदूची नस ब्लॉक झाल्यास किंवा फाटल्यास स्ट्रोक होतो. ज्यामुळे काही वेळासाठी पक्षाघात होऊ शकतो. मात्र तुम्हाला हे माहितीये का, की महिलांमध्ये पुरुषांपेक्षा स्ट्रोकची लक्षणे वेगळी असू शकतात.

वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. कान्नेपाली राव यांनी सांगितले की, अभ्यासातून असे निदर्शनात आले आहे की, महिलांमध्ये स्ट्रोकची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असू शकतात. ज्यात सामान्य लक्षणांपेक्षी ही लक्षणे जरा वेगळी असतात. डॉक्टरांच्या मते, या कारणाने महिलांमध्ये अचानक अशक्तपणा किंवा सूस्तपणा जाणवतो. ही लक्षणे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक दिसून येते.

स्ट्रोकमध्ये दिसून येतात ही लक्षणे

शरीराचा एक भाग किंवा चेहरा सुन्न पडणे आणि अशक्तपणा जाणवणे

बोलण्यास त्रास होणे किंवा समजण्यास त्रास होणे

एका किंवा दोन्ही डोळ्यांनी दिसण्यास समस्या

चालण्यास त्रास होणे, अस्वस्थपणा जाणवणे

अचानक डोकेदुखी

महिलांमध्ये दिसतात ही लक्षणे

उचक्या लागणे

अस्वस्थता

थकवा

श्वास घेण्यास त्रास होणे

हृदयाचे ठोके वाढणे

महिलांमध्ये स्ट्रोकचा धोका

World Stroke Day
Stroke Level In World : वर्ष 2050 पर्यंत एक कोटी लोकांचा स्ट्रोकमुळे होऊ शकतो मृत्यू, रिसर्चचा दावा

शास्त्रज्ञांच्या मते, महिला आणि पुरुषांमध्ये वेगवेगळी लक्षणे अनुभवण्यामागे त्यांचे हार्मोन्स जबाबदार असू शकतात. महिलांमध्ये एस्ट्रोजेन हार्मोन स्ट्रोकविरोधात सुरक्षा देणारे आढळून आले आहे. असे एस्ट्रोजेन अँटीइनफ्लामेटरी गुणांमुळे असू शकते. जे ब्रेन डॅमेजपासून तुमचा बचाव करते. सोबतच हे हार्मोन रक्ताचा प्रवाह वाढवते. ज्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो.

World Stroke Day
Brain Stroke Risk: या सवयी असलेल्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका सर्वाधिक, लगेच सवयी बदला, नाहीतर...

का येतो स्ट्रोक?

डॉक्टरांच्या मते, धुम्रपान करणाऱ्या पुरुष आणि महिलांमध्ये स्ट्रोकचा धोका जास्त असतो. धुम्रपानाने ब्लड प्रेशर, मधुमेह, कोलेस्ट्रॉल यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. तर महिलांमध्ये प्रेग्नंसी, प्रीक्लेम्पसिया, गर्भनिरोधक गोळ्या, मायग्रेन, असामान्य हृदयाचे ठोके यांमुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.