World TB Day 2024: जगभरात 24 मार्च हा दिवस ट्युबरक्युलॉसिस डे म्हणजेच जागतिक क्षयरोग दिन (TB Day) म्हणून साजरा केला जातो. पण हा दिवस का साजरा केला जातो, यामागील कारण काय, याबद्दल माहिती करून घेऊ.
खरंतर WHO ने दिलेल्या माहितीनुसार साल 1882 मध्ये 24 मार्च रोजीच डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी घोषणा केली होती की त्यांना क्षयरोग होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरियाचा शोध लागला आहे. त्यामुळे पुढे या रोगाचे निदान करण्याचा आणि त्यावर उपचार शोधण्याचा मार्ग खुला झाला.
या शोधासाठी डॉक्टर रॉबर्ट कोच यांना 1905 मध्ये नोबेल पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
क्षयरोगाच्या आरोग्यावरील, सामाजिक आणि आर्थिक परिणामांबद्दल जनजागृती करण्यासाठी हादिवस साजरा केला जातो. तसेच या संसर्गजन्य रोगाचा अंत करण्यासाठीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठीही हा दिवस साजरा केला जातो.
क्षयरोग हा मायकोबॅक्टोरियम ट्युबरक्लॉसिस या बॅक्टेरियामुळे होतो. हा रोग संसर्गजन्य असला, तरी उपचाराने बरा होऊ शकतो. क्षयरोगाचा धोका सर्वाधिक लहान मुलांना असतो.
याशिवाय मधुमेह, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या, कुपोषित आणि व्यसन असणाऱ्यांनाही याचा धोका अधिक असतो.
क्षयरोगाची सर्वसाधारण लक्षणे म्हणजे दीर्घकाळचा खोकला, छातीत दुखणे, अशक्तपणा, थकवा, वजन कमी होणे, ताप आणि रात्री घाम येणे.
क्षयरोगाचा परिणाम आधी फुफ्फुसांवर होतो, तसेच किडनी, मेंदू,पाठीचा कणा आणि त्वचेवरही होतो.
दरम्यान, क्षयरोग पूर्ण बरा होऊ शकतो. योग्यवेळी रोगाचे निदान झाल्यास त्यावर उपचार शक्य आहेत. निदानासाठी वेगवेगळ्या चाचण्या आहेत. त्यावर अँटिबायोटिक्स वापरून उपचार होतात. योग्यवेळी योग्य निदान आणि वैद्यकीय उपचारांनंतर हा आजार बरा होतो. २००० सालापासून साडेसात कोटींहून अधिक रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत.
दरम्यान जागतिक श्रयरोग दिवस साजरा करताना प्रत्येक वर्षाची एक थीम ठेवली जाते, त्यानुसार 2024 सालासाठी 'हो! आपण टीबीला संपवू शकतो'(Yes! We can end TB!) अशी थीम आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.