Yog For Snoring Problem : दिवसभराची, धावपळ, दगदग आणि थकवा यानंतर कधी एकदा पाठ टेकतोय आणि झोपतो असं होतं, पण जर शेजारी घोरणारी व्यक्ती असेल तर तुमच्या या मनसुब्यावर सविस्तर पाणी फेरलं जातं. मग आपली झोप न झाल्याने त्याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होतो.
पण तुम्हाला माहितीये का, की घोरणारी व्यक्ती का घोरते? कारण त्यांना श्वास घ्यायला अडचण होत असते. पण काही थोड्याशा प्रयत्नांनी हा त्रास कमी करणं शक्य असतं.
ज्या लोकांना स्मोकिंग, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब असे प्रॉब्लेम असतात त्यांना घोरण्याचा त्रास असतो. यावर उपया म्हणून या दोन गोष्टी नियमित केल्या तर या समस्येतून मुक्ती मिळणे शक्य आहे. १) सिंहासन आणि २) भ्रामरी प्राणायाम
सिंहासन
या आसनात व्यक्तीचे शरीर सिंहासारखे दिसते.
या आसनासाठी प्रथम दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून वज्रासनात बसा.
दोन्ही हात दोन्ही पायांच्या मध्ये, बोटे मागे वळून सरळ ठेवा.
दीर्घ श्वास घेऊन जीभ बाहेर काढा.
हे करताना दोन्ही डोळे उघडून जमीनीकडे पहा.
शक्य तेवढे जास्त तोंड उघडा.
श्वास सोडताना सिंहाप्रमाणे गर्जना करा.
ही क्रिया १५ वेळी गर्जनेसह करा.
भ्रामरी प्राणायाम
या प्राणायामात भुंग्यासारखा आवाज केला जातो. यामुळे मानसिक, शारीरिक आरोग्याचे फायदे मिळतात.
पहिले मांडी घालून बसा.
दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी कान बंद करा.
पहिलं बोट कपाळावर आणि उरेली बोटं डोळ्यावर अलगत ठेवा.
मोठा श्वास घ्या. थोड्यावेळ आत धरून ठेवा.
हळू हळू बाहेर सोडताना हम्म्म्म्म् असा भूंग्यासारखा आवाज करा.
असे ५ वेळा करावे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.