Sinus Problem: नांक बंद होणे, श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास तुम्हाला सायनसचा त्रास असल्याचे स्पष्ट होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नाक किंवा डोके यांच्यामध्ये काही जागेत जळजळ झाल्यामुळे सायनसच्या समस्या उद्भवतात. सायनसच्या त्रासाने अनेकजण वैतागतात. सायनसचा त्रास घालवण्यासाठी हे सोपे उपाय तुम्हाला लाभदायक ठरू शकतात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, श्वसनाच्या संसर्गामुळे, अॅलर्जीमुळे किंवा नाकातील त्रासामुळे अशा समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. सायनसचा संसर्ग जसजसा वाढू लागतो तसतश्या तुमच्या डोळ्यांच्याही समस्या वाढू लागतात. काही योगासने या समस्येची लक्षणे कमी करण्यास मदत करतील. (Health)
अधोमुख शवासन
अधोमुख शवासन योग शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतो. सायनसच्या समस्येने त्रस्त असलेल्यांना या योगाचा विशेष फायदा होतो. असे योग तज्ञांचे म्हणणे आहे. या योगाच्या नियमित सरावाने रक्ताभिसरण सुधारणे, अवरोधित वाहिन्या उघडतात आणि संपूर्ण शरीरातील तणाव दूर करण्यासही हे आसन फायदेशीर आहे. म्हणून याला सायनस आराम व्यायाम म्हणून ओळखले जाते.
शलभासन योग
हा योग हात, मांड्या, पाय आणि छाती मजबूत करण्यासाठी ओळखला जातो. आराम आणि मन शांत करण्यासाठी ही मुद्रा अत्यंत फायदेशीर आहे. या योग सायनुसायटिस आणि इतर ऍलर्जीच्या स्थितीपासून आराम तर देतोच सोबतच झोपेच्या समस्याा आणि चिडचिड देखील कमी करते. या योगाचे फायदे फुफ्फुसात रक्तप्रवाह सुधारून शरीराला संसर्गापासून वाचवण्यातही दिसून आले आहेत.
मत्स्यासन योग
हे योग फुफ्फुस आणि श्वसनाच्या समस्यांवर मात करण्यासाठी सर्वात प्रभावी योगासनांपैकी एक आहे. हे एक आसन आहे जे फुफ्फुसांच्या स्नायूंना ताणण्याबरोबरच खोल श्वास घेण्यास प्रोत्साहन देते. हे सायनुसायटिसपासून आराम देत छाती आणि घशातील अवरोधित वाहिन्या उघडते. या योगासनांचे फायदे ऍलर्जीक स्थितीपासून मुक्त होण्यासाठी, रक्त परिसंचरण वाढविण्यात आणि संपूर्ण रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यात महत्वाचे आहे.
डिस्क्लेमर: काही आरोग्याच्या समस्या असल्यास हे आसन करण्यास कदाचित तुम्हाला बंधनं असू शकतात. त्यासाठी आधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.