Yoga Day 2023 : डाएटींग न करता वजन कमी करायचंय? या 5 आसनांशी करा मैत्री

वजन कमी करणे ही प्रत्येकाची समस्या झाली आहे, पण डाएटींग जमतेच असं नाही.
Yoga Day 2023
Yoga Day 2023esakal
Updated on

Easy Yoga Tips For Weight Loss : हल्लीच्या लाइफस्टाइलमुळे वजन वाढणे ही बहुतेकांची समस्या झाली आहे. अनियमित आणि चुकीची खाण्यापिण्याची सवय ही वजन वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे. वाढते वजन अनेक आजारांना निमंत्रण देतात. पण लोकांना वजन कमी करायचे म्हटले तर खाण्यावर नियंत्रण म्हणजे फक्त डाएटींग अशी एक धारणा आहे. त्यामुळे बरेचसे लोक यापासून लांब राहतात. पण हे काही योगासनं आहेत, ज्यामुळे डाएटींग न करता वजनावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.

Yoga Day 2023
Yoga Day 2023esakal

योगचा अभ्यास फक्त शारीरिक नाही तर मानसिक फायदेही देतात. यामुळे संपूर्ण आरोग्यात सुधार होतो.

सूर्य नमस्कार

सूर्याला नमस्काराच्या रुपात सूर्यनमस्कार घातला जातात. सूर्यनमस्कारामुळे शरीरातले फॅट्स बर्न होतात. लवचिकता येते. स्नायू बळकट होतात. कॅलरीज बर्न होतात. शिवाय यामुळे तुमचे मेटाबोलीझमपण सुधारते.

Yoga Day 2023
Yoga Day 2023: तुम्हाला अंगदुखी, पाठदुखीचा त्रास आहे का? दररोज सकाळी करा सूर्यनमस्कार, जाणून घ्या फायदे
Yoga Day 2023
Yoga Day 2023esakal

नौकासन

हे आसन पोटाच्या स्नांयूंबरोबरच इतर अवयवांच्या स्नायूंनाही बळकटीही देतात. यामुळे पचन सुधारते शिवाय बेली टोनिंगही होते. यासाठी पाय पसरवून जमीनीवर बसावे. थोडे मागे झुकावे. हात सरळ समोर करावे. पायंना ताठ वर उचलावे आणि सर्व वजन माकड हाडावर पेलावे.

Yoga Day 2023
International Yoga Day 2023: योगदिनाच्या निमित्ताने!
Yoga Day 2023
Yoga Day 2023esakal

वीरभद्रासन

या आसनामुळे कंबरेचे आणि मांड्यांचे स्नायू बळकट होतात. हे एक शक्तीशाली आसन आहे. यात एका पायावर उभे राहून दुसरा पाय सरळ मागच्या बाजूने वर करत कंबरेत झुकावे. हात सरळ समोरच्या बाजूने ताठ करावे. नजर सरळ असावी. श्वासावर लक्ष ठेवत सामान्य चालू ठेवावा. नंतर दुसऱ्या पायाने हिच कृती करावी.

Yoga Day 2023
Yoga for Skin: निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी करा ही चार योगासने
Yoga Day 2023
Yoga Day 2023esakal

सेतू बंधासन

हे आसन पाठीचा खालचा भाग, हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्सवर केंद्रित आहे. यासाठी आधी पाठीवर झोपावे. पाय गुडघ्यात वाकवून नितंभाजवळ खाली टेकवावे. मान टेकलेली ठेवत पाठ, कंबर वर उचलत हाताने टाचा पकडाव्या. नंतर हात दोन्ही पायाच्या मध्ये नेत एकमेकांत गुंतवावे.

Yoga Day 2023
Yoga Day 2023esakal

कुंभकासन

या आसनामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. यात हात, पाय, खांदे आणि मांड्या अशा सगळ्याला ताण पोहतचो. या साठी पोटावर ताठ झोपावे. पुश अप्स करतो त्या पोझिशन मध्ये वर उठावे. हात सरळ करावे. कंबर आत. संपूर्ण शरीराची स्थिती उतरती असावी. शक्य तेवढ्यावेळ या स्थितीत थांबावे. हळू हळू स्थिती सोडत जमीनीवर यावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.