Yoga For Anemia : आपल्या शरीरात लाल रक्तपेशींची (RBC) किंवा हिमोग्लोबीनची कमतरता निर्माण झाली की, ॲनिमियाची समस्या उद्भवते. ॲनिमियामुळे व्यक्तीला अशक्तपणा येतो किंवा चक्कर येते. या स्थितीमध्ये शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही.
त्यामुळे, अशक्तपणा आणि थकवा यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. शरीरात लोहाची कमतरता, व्हिटॅमिन बी १२, फॉलिक ॲसिडची कमतरता आणि कर्करोगासारखे जुनाट आजार इत्यादी कारणांमुळे ही ॲनिमिया होऊ शकतो.