Yoga for Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी करावी 'ही' चार योगासनं... आजपासूनच करा सुरुवात

जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर तुम्ही दररोज योगासने करावीत.
Yoga
Yoga sakal
Updated on

मधुमेह हा एक गंभीर आजार आहे, ज्याचा लोकांवर झपाट्याने परिणाम होत आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्याने नियमित तपासणी, चांगला आहार घेणे गरजेचे आहे पण तुम्हाला माहिती आहे का काही योगासने सुद्धा मधुमेहासाठी उपयुक्त ठरतात. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा योगासनांची माहिती देणार आहोत, जे केल्‍याने रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या कमी होईल.

धनुरासन

धनुरासन हा थकवा दूर करतो. हे तुमचे मुख्य स्नायू मजबूत करते, बद्धकोष्ठतेशी संबंधित अस्वस्थता कमी करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास योगदान देते.

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार हा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी सर्वात फायदेशीर योग आहे. सूर्यनमस्कार केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते, रक्ताभिसरण वाढते आणि लवचिकता वाढते.

Yoga
Health Care News : वजन कमी करण्यासोबतच बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आहारात दह्याचा अशा प्रकारे करा समावेश...

पश्चिमोत्तनासन 

  • दोन्ही पाय जमिनीवर सरळ पसरून बसा. दोन पायांमध्ये अंतर नसावे आणि पाय शक्य तितके सरळ ठेवावे. यासोबतच मान, डोके आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. यानंतर तुमचे दोन्ही तळवे दोन्ही गुडघ्यावर ठेवा. 

  • आता हळू हळू डोके पुढे टेकवा आणि गुडघे न वाकवता हाताच्या बोटांनी पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

  • यानंतर दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. दोन्ही गुडघ्यांसह आपले डोके आणि कपाळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

  • खांद्यांना वाकवा आणि कोपराने जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

  • पूर्ण श्वास सोडा आणि काही वेळ या आसनात राहा.

  • काही सेकंदांनंतर, पुर्वस्थितीवर परत या.

  • आता सामान्यपणे श्वास घ्या आणि हे आसन 3 ते 4 वेळा करा.

बालासन

  • वज्रासन आसनात बसा आणि पाठीचा कणा सरळ ठेवा.

  • श्वास घेताना दोन्ही हात वर करा.

  • श्वास सोडताना कंबरेचा वरचा भाग पुढे वाकवा.

  • हात सरळ ठेवा आणि डोकं जमिनीवर ठेवा.

  • 30 सेकंदांपर्यंत या आसनात बसा.

Shabda kode:

Related Stories

No stories found.