Yoga for Healthy Hair : शॅम्पू किंवा तेल नाही तर 'या' योगासनांनी वाढतील केस; केसांचं गळणं गायब...

तुम्ही तुमच्या दिनचर्येत येथे दिलेल्या योगाचा समावेश करावा. काही दिवसातच तुम्हाला त्याचे फायदे दिसू लागतील.
Yoga for Healthy Hair : शॅम्पू किंवा तेल नाही तर 'या' योगासनांनी वाढतील केस; केसांचं गळणं गायब...
Updated on

तंदुरुस्त राहण्यासाठी योग हा एक उत्तम मार्ग आहे. याचा सराव करून तुम्ही आजारांपासून दीर्घकाळ दूर राहू शकता. रोज योगा केल्याने आरोग्यासोबतच त्वचा आणि केसही निरोगी ठेवता येतात. त्यामुळे जर तुमचे केस खूप पातळ असतील, जास्त तुटत असतील आणि वाढ चांगली होत नसेल, तर तुम्ही तुमच्या दिनचर्येत येथे दिलेल्या योगाचा समावेश करावा. काही दिवसातच तुम्हाला त्याचे फायदे दिसू लागतील.

वज्रासन

ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांना वज्रासन करण्याची शिफारस केली जाते. या आसनाच्या सरावाने गॅस्ट्रिक समस्या आणि इतर पचन विकार देखील दूर झाले आहेत. हे केसांच्या वाढीस मोठ्या प्रमाणात चालना देण्यास मदत करते. जेवणानंतर पाच ते दहा मिनिटे या आसनात बसल्याने पचन सुधारते, ज्यामुळे केसांच्या आरोग्यास हळूहळू मदत होते.

Yoga for Healthy Hair : शॅम्पू किंवा तेल नाही तर 'या' योगासनांनी वाढतील केस; केसांचं गळणं गायब...
Health Care News : आठवडाभर काजू दुधात भिजवून खाल्ल्यास काय होते माहित आहे का? जाणून घ्या

अधोमुख श्वान आसन

अधोमुख श्वान आसन हे डोक्यातील रक्त प्रवाह सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे जे केसांच्या वाढीस मदत करू शकते. या आसनाचा दररोज काही काळ सराव केल्यास केसगळती बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.

मत्स्यासन

या आसनाला 'फिश पोज' म्हणूनही ओळखले जाते. हे आसन ज्यांना लांब, मजबूत आणि चमकदार केस हवी आहेत त्यांच्यासाठी आवश्यक आहे. या आसनाचा दररोज सराव केल्याने तुम्ही केवळ केसगळतीच नाही तर केसांच्या बहुतांश समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

शष्कासन

शष्कासन याला इंग्रजीत रॅबिट पोज असेही म्हणतात. हे आसन हार्मोन्स संतुलित करते आणि टाळूमध्ये ब्लड सर्कुलेशन वाढवते. ज्यामुळे केस गळतीपासून आराम मिळतो.

Shabda kode:

Related Stories

No stories found.