Yoga For Mental Health : सध्याची बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अन् व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे शारिरीक अन् मानसिक आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कामाची दगदग, ताण-तणाव आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना मानसिक आरोग्याच्या समस्या जसे की, चिंता, नैराश्य अन् एकटेपणा भेडसावतो. या मानसिक ताण-तणावामुळे व्यक्तीला एकटेपणा आणि उदासपणा जाणवू लागतो.