Office Yoga : सतत कम्प्युटरवर काम करून मान दुखते? हा सोपा व्यायाम देईल एकदम रिलीफ

स्नायू आखडतात. पण काही सोपे व्यायाम केले तर हा ताण घालवता येऊ शकतो.
Office Yoga
Office Yogaesakal
Updated on

Yoga For Neck Stress In Office Work : तासन् तास कम्प्युटर, लॅपटोप समोर बसून एकाच पोझिशनमध्ये नजर लावून काम केल्याने त्याचा मानेवर आणि पाठीवर ताण येतो. तेथील स्नायू आखडतात. पण काही सोपे व्यायाम केले तर हा ताण घालवता येऊ शकतो.

जाणून घेऊया त्या व्यायामांविषयी...

असे करा आसन

  • खुर्चीवर ताठ बसून मान डावीकडे व उजवीकडे वाकवा.

  • म्हणजेच, डावा कान डाव्या खांद्याजवळ येईल अशी मान वाकवणे व नंतर उजवीकडे वाकवणे.

  • ही क्रिया ३ ते ४ वेळा करणे.

  • याच प्रकारात डावा हात वरती घेऊन डाव्या हाताच्या बोटांनी उचव्या बाजूच्या डोक्यावर हलकेच दाब देऊन मान डाव्या खांद्याकडे वाकवून १० ते १५ सेकंद स्थिर राहणे.

  • नंतर दुसऱ्या बाजूलाही वाकवणे.

Office Yoga
Office Yoga : एकाच जागी बसून पाठीला रग लागते? ऑफीसमध्ये करा हा व्यायाम

आसनाचे फायदे

  • मानेच्या शिरा मोकळ्या होतात व स्नायूंचा कडकपणा निघून जातो.

  • अनेक जण मान बराच वेळ पुढे घेऊन काम करतात किंवा मान, खांदे चुकीच्या स्थितीत ठेवतात. या प्रकाराने होणारी मानदुखी कमी होण्यास या आसनाचा उपयोग होतो.

स्थिती क्रमांक २

  • वरील प्रकार करून झाल्यावर मानेचे अर्धगोल चक्र करावे. म्हणजेच मानेचे हाफ रोटेशन करावे.

  • मान अर्धगोलाकार स्थितीत फिरवल्यावर मानेला हलकेपणा येतो, मान रिलॅक्स होते.

  • अनेकदा मानेचे त्रास बराच वेळ एकाच जागी चुकीच्या पद्धतीने बसल्याने होतात. त्यामुळे मानेचे व्यायाम दिवसातून दोनदा नक्की करावे. सावकाश करावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()