Back Fat Exercises : पाठीवरची चरबी कमी करायची? मग रोज करा फक्त 2 आसन, लवकरच जाणवेल फरक

Health Care News : आज आम्ही तुम्हाला काही योगासनांबद्दल सांगत आहोत जे तुमच्या पाठीवरची चरबी कमी करू शकतात.
Back Fat Exercises
Back Fat Exercisessakal
Updated on

आजकाल प्रत्येक व्यक्तीला तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असते. पण खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होते. हात, पाय, चेहरा, पोट आणि पाठीवरच्या चरबीमुळे लोकांना अनेकदा त्रास होतो, तर पाठीवरची चरबीही कमी करणे कठीण जाते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला काही योगासनांबद्दल सांगत आहोत जे तुमच्या पाठीवरची चरबी कमी करू शकतात आणि तुम्हाला टोन्ड बॅक देऊ शकतात, यासोबतच संपूर्ण शरीराला यामुळे टोनिंग होण्यास मदत होईल.

धनुरासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

धनुरासन हे योगासन करायला अतिशय सोपे आहे. परंतु, याचा सराव करण्यासाठी तुमची चांगली एकाग्रता आणि शारिरीक संतुलन असणे आवश्यक आहे.

हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पोटावर झोपा.

आता तुमचे दोन्ही हात पायांच्या जवळ ठेवा. त्यानंतर, तुमचे दोन्ही गुडघे वाकवून ते धरण्याचा प्रयत्न करा.

आता दीर्घ श्वास घेताना तुमची छाती वरच्या दिशेने उचला आणि हातांनी पाय ओढा.

या स्थितीमध्ये तुमच्या श्वासाच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करा.

२०-२२ सेकंद या स्थितीमध्ये रहा. आता तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल.

त्यानंतर, सामान्य स्थितीमध्ये या.

Back Fat Exercises
Monsoon Health Care : तुम्हाला माहीत आहे का पावसाळ्यात रोज 1 चमचा मध खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या

भूजंगासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

भूजंगासन हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पोटावर सरळ झोपा आणि पायांमध्ये थोडे अंतर ठेवा.

आता तुमचे दोन्ही हात छातीजवळ नेऊन हाताचे तळवे जमिनीला समांतर ठेवा.

आता दीर्घ श्वास घेऊन पोट वरच्या दिशेने उचला आणि आकाशाकडे पाहा.

काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यावर तुम्हाला शरीरात ताण जाणवेल.

या दरम्यान सामान्यपणे श्वासोच्छवास घेत राहा.

त्यानंतर, पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.

हा सराव २-३ वेळा करा

Shabda kode:

Related Stories

No stories found.