Yoga for eyes : सकाळी झोपेतून उठल्यावर डोळे सुजलेले दिसतात? मग दररोज करा ही योगासनं

Eye Care Tips : जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर तज्ज्ञांनी सुचवलेल्या या दोन योगासनांच्या मदतीने तुम्ही डोळ्यांखालील सूज कमी करू शकता.
Eye Care Tips
Eye Care Tipssakal
Updated on

झोपेच्या कमतरतेचा आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो. पुरेशी झोप न मिळाल्यास डोळ्यांखाली सूज येते. चेहरा निर्जीव दिसतो. जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर तज्ज्ञांनी सुचवलेल्या या दोन योगासनांच्या मदतीने तुम्ही डोळ्यांखालील सूज कमी करू शकता. चला तर जाणून घेऊया.

पश्चिमोत्तासन

जेव्हा तुम्ही हे आसन करता तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर पुढे वाकते. यामुळे चेहरा आणि डोळ्यांभोवती रक्ताभिसरण वाढते आणि जेव्हा रक्ताभिसरण वाढते तेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. यामुळे सूज हळूहळू कमी होऊ लागते. हे आसन केल्याने मेंदूतील रक्त परिसंचरण सुधारते आणि चांगली झोप लागते.

पश्चिमोत्तासन कसे करावे

या योगासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर दोन्ही पाय पसरून जमिनीवर बसा.

त्यानंतर, एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमचे शरीर हळूहळू पुढे वाकवा.

आता तुमच्या पायाच्या बोटांना दोन्ही हातांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

या स्थितीमध्ये तुमचे दोन्ही गुडघे ताठ असायला हवेत.

आता काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला शरीरात ताण जाणवेल.

त्यानंतर, तुम्ही सामान्य स्थितीमध्ये या.

Eye Care Tips
Monsoon Health Care : तुम्हाला माहीत आहे का पावसाळ्यात रोज 1 चमचा मध खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या

बालासन

जेव्हा तुम्ही हे आसन करता तेव्हा तुमच्या चेहऱ्याभोवती आणि डोळ्यांभोवती रक्ताभिसरणही वाढते. हे आसन केल्याने चांगली झोप लागते जी सूज कमी करण्यास मदत करते.

बालासन कसे करावे

या योगासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर बसा.

यानंतर श्वास घेताना दोन्ही हात वर घ्या आणि श्वास सोडताना पुढे वाका.

यानंतर जमिनीवर डोकं टेकवताना या आसनात आल्यानंतर शरीराला हलकं सोडा आणि रिलॅक्स व्हा.

श्वास घ्या आणि श्वास सोडा. श्वास घेताना आणि श्वास सोडताना कोणतीही घाई करू नका.

या पोझमध्ये तुम्ही १ ते ३ मिनिटं राहू शकता.

हे दिवसातून कमीत कमी ५ वेळा करा.

नंतर हात वर करून हळहळू पूर्व स्थितीत या.

Related Stories

No stories found.