Yoga Tips : मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना मोठ्या प्रमाणात वेदना होणे हे स्वाभाविक आहे. या वेदनांसोबतच अस्वस्थता, थकवा आणि अशक्तपणा देखील जाणवतो. काही महिलांना तर याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काही महिलांना औषधांची मदत देखील घ्यावी लागते.
परंतु, या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही योगाची देखील मदत घेऊ शकता. जर तुम्ही नियमितपणे योगाभ्यास केला तर, मासिक पाळीदरम्यान येणाऱ्या अनेक समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. योगासनांमध्ये विविध योगासनांचा समावेश असतो.
या आसनांपैकी एक असलेले बद्धकोणासन केल्याने मासिक पाळीच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. त्यासाठी या आसनाचा दररोज सराव करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात बद्धकोणासन करण्याची योग्य पद्धत अन् फायदे कोणते?
बद्धकोणासन करण्यासाठी सर्वात आधी पाय पसरून सरळ बसा. आता तुमचे दोन्ही पाय आतल्या बाजूस वळवा.
या स्थितीमध्ये तुमचे दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना स्पर्श करतील, याची काळजी घ्या.
त्यानंतर, तुमच्या दोन्ही पायांचे तळवे तुमच्या दोन्ही हातांनी धरा.
आता या स्थितीमध्ये दीर्घ श्वास घ्या आणि हात-पाय ताठ ठेवा.
तुम्हाला आता शरीरात ताण जाणवेल. काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर, हळूहळू श्वास सोडा.
आता श्वास सोडताना तुमचे दोन्ही गुडघे, मांड्या जमिनीच्या दिशेने न्या.
आता तुमचे दोन्ही पाय फुलपाखरासारखे वर आणि खाली हलवण्याचा प्रयत्न करा. हळूहळू तुमचा वेग वाढवा.
त्यानंतर, सामान्य स्थितीमध्ये परत या.
बद्धकोणासन नियमित केल्याने शरीराचा थकवा दूर होण्यास मदत होते.
हे योगासन दररोज केल्याने रजोनिवृत्तीच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास देखील मदत करते.
बद्धकोणासन केल्याने मांड्या आणि गुडघ्यांचे स्नायू मजबूत होतात आणि शरीर लवचिक होण्यास फायदा होतो.
बद्धकोणासन केल्याने प्रसूती सुलभ होऊ शकते.
हे योगासन नियमित केल्याने मासिक पाळीमध्ये होणारा त्रास कमी होतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.