Yoga Tips: बेंच प्रेस व्यायाम केल्याने शरीर राहते लवचिक अन् हाडं होतात मजबूत

Yoga Tips: जर तुम्ही नियमितपणे वर्कआउट रूटीनमध्ये बेंच प्रेस एक्सरसाइजचा सराव केला तर अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
Yoga Tips
Yoga TipsSakal
Updated on

Yoga Tips: योगा करणे आरोग्यासाठी फायदशीर असते. अनेक लोकांना फिट राहणे आवडते. यासाठी व्यायाम आणि योगा करतात. स्ट्रेंथ ट्रेनिंग करताना शरीराच्या प्रत्येक भागावर लक्ष केंद्रित केले जाते. अनेक लोक बेंच प्रेस करतात. याचे अनेक आरोग्यादायी फायदे देखील आहे.

यामुळे तुमच्या शरीराचे अनेक स्नायू एकाच वेळी गुंतलेले असतात. बेंच प्रेस एक व्यायामाचा प्रकार आहे. जे लोक त्यांच्या वर्कआउट रूटीनमध्ये बेंच प्रेस व्यायाम समाविष्ट करतात त्यांना बरेच फायदे मिळतात.

स्नायू मजबूत

बेंच प्रेस व्यायाम केल्याने तुमच्या वरच्या शरीराची ताकद वाढते. जेव्हा तुम्ही हा व्यायाम करता तेव्हा शरीराच्या वरच्या भागाचे स्नायू मजबूत होतात. बारबेल उचलल्याने तुमची ताकद वाढते.

हाडांचे आरोग्य निरोगी

बेंच प्रेस केल्याने हाडांचे आरोग्य निरोगी राहते. तसेच आपल्या क्षमतेनुसार वजन उचलावे. यामुळे हाडांची घनता सुधारते. हाडांमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात.

Yoga Tips
Yoga Tips: पाच वर्षांपर्यंतच्या मुलांनी किती वेळ व्यायाम करावा? वाचा तज्ञ सांगतात

मानसिक आरोग्य

बेंच प्रेसचा सराव केल्याने केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्य देखील निरोगी राहते. जेव्हा तुम्ही बेंच प्रेस करता तेव्हा तुमचा ताण काही प्रमाणात कमी होतो. असे घडते कारण शारीरिक क्रियाकलाप करताना एंडोर्फिन सोडले जातात, जे नैसर्गिक मूड लिफ्टर म्हणून कार्य करते.

मेटाबॉलिज्मसाठी फायदेशीर

बेंच प्रेसचा सराव केल्याने सकारात्मक परिणाम मेटाबॉलिज्मवरही दिसून येतो. बेंच प्रेस हा एक कंपाऊंड व्यायाम आहे आणि म्हणून ते करण्यासाठी भरपूर ऊर्जा लागते. ज्याचा तुमच्या मेटाबॉलिज्मवर चांगला परिणाम होतो. ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा वजन राखायचे आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला व्यायाम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.