Yoga For Slip Disk : आजकाल लॅपटॉपवरील सततच्या कामामुळे, घरातील इतर दैनंदिन कामांमुळे आणि बैठ्या जीवनशैलीमुळे कंबर-पाठदुखीची समस्या वाढत चालली आहे. या समस्या सामान्य जरी असल्या, तरी कधी कधी या वेदना असह्य होतात, परिणामी स्लिप डिस्कची समस्या उद्भवते.
लॅपटॉपवरील कामामुळे तासनतास चुकीच्या आसनात बसणे, बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अन् व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे स्लिप डिस्कची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.