Yoga Tips : निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि योग्य संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. आजकाल शरीर तंदूरूस्त ठेवण्यासाठी लोक योगा, वर्कआऊट आणि विविध प्रकारचे व्यायाम करतात. यापैकी योगा आपले मानसिक आणि शारिरीक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. त्यामुळे, नियमितपणे योगा करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
योगासनांमध्ये विविध प्रकारच्या योगासनांचा समावेश होतो. या योगासनांपैकी एक असलेले सूखासन शारिरीक अन् मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. ज्या लोकांनी नुकतीच योगा करायला सुरूवात केली आहे. त्यांच्यासाठी हे योगासन करायला अतिशय सोपे आहे. सूखासन म्हणजे आरामात बसणे. हे आसन कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात सूखासन करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे आरोग्यदायी फायदे कोणते?
सूखासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पाय पसरून बसा. या दरम्यान, तुमची पाठ सरळ ठेवा.
आता तुमचे दोन्ही पाय गुडघ्यातून आतील बाजूस वाकवा आणि तुमचे गुडघे बाहेरच्या बाजूला ठेवा.
आता आरामशीर बसा आणि तुमचे गुडघे जमिनीला स्पर्श करत राहतील हे लक्षात ठेवा.
या स्थितीमध्ये तुमची कंबर, मान, डोके आणि पाठीचा कणा पूर्णपणे सरळ ठेवा.
आता डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या आणि या आसनात काही मिनिटे बसा
या योगासनाचा नियमित सराव केल्याने शरीर आणि मन शांत आणि स्थिर राहण्यास मदत होते.
सूखासनाचा दररोज सराव केल्याने थकवा, ताण-तणाव, नैराश्य आणि अस्वस्थता दूर करण्यास मदत होते.
आपल्या शरीराचे योग्य संतुलन राखण्यासाठी सूखासन हे योगासन उपयुक्त ठरते.
या योगासनाचा दररोज सराव केल्याने पाठीचा कणा ताठ आणि बळकट होण्यास मदत होते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.