Monsoon Yoga Tips: 'या' 3 योगासनांचा सराव केल्यास पिंपल्सपासून मिळेल सुटका

yoga tips to get rid of pimples in monsoon: पावसाळ्यात चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर पुढील ३ योगासनांचा सराव करू शकता.
Monsoon Yoga Tips:
Monsoon Yoga Tips: Sakal
Updated on

How to get rid of pimples in monsoon:  पावसाळ्यात आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. तसेच त्वचेच्या देखील अनेक समस्या निर्माण होतात. खाण्याच्या सवयी, अपचन आणि खराब जीवनशैलीमुळे त्वचेवर पिंपल्स येतात. पिंपल्समुळे चेहऱ्यावरचे सौंदर्य खराब होते. तसेच टॅनिंगमुळे चेहरा निर्जीव दिसतो. या समस्या कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय किंवा महागडे ब्युटी प्रोडक्ट देखील वापरतात. पण त्याचा चेहऱ्यावर कोणताही परिणाम दिसत नाही. पण तुम्ही चेहऱ्यावरचे पिंपल्स पुढील तीन योगा करून कमी करू शकता.

Balloon Face
Balloon Face

बलून फेस

पिंपल्सची समस्या कमी करण्यासाठी बलून फेस योगा करू शकता. यासाठी तोंडाला फुग्यासारखा आकारात फुगवा. १० सेकंद चेहरा तसाच ठेवा. हा योग कधीही करू शकता. नियमितपणे हा योग केल्यास चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होतात.

Simhasana
SimhasanaSakal

सिंहासन

हा योग नियमितपणे सकाळी केल्यास चेहऱ्यावरचेपिंपल्स कमी होतात. तसेच चेहऱ्याचे रक्ताभिसरण चांगले राहते. सिंहासन करण्यासाठी चटईवर बसावे. दोन्ही गुडघे वाकवून मागे करून बसावे. म्हणजेच सिंहाच्या मुद्रेत बसावे. नंतर तोंड उघडून जिभ बाहेर काढावी. नाकातून स्वास घ्यावा आणि डोळे उघडे ठेवावे. हे आसन ५ ते ६ वेळा करावे.

sarvangasana
sarvangasanaSakal

सर्वांगासन

चेहरा चमकदार दिसण्यासाठी आणि पिंपल्सची समस्या कमी करण्यासाठी सर्वांसनाचा सराव करू शकता. तसेच या योगामुळे पचन सुरळित राहते. हे आसन करण्यासाठी चटईवर पाठीवर झोपावे आणि तळवे खाली ठेवावे. पाय हवेत सरळ वर उचला आणि डोक्यावर वळवावे. हाताच्या मदतीने आपले खांदे पाठीचा कणा आणि नितंब सरळ ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.