Yoga Tips: पाच वर्षांपर्यंतच्या मुलांनी किती वेळ व्यायाम करावा? वाचा तज्ञ सांगतात

Child Yoga Tips: लहान मुलांसाठी योगा करणे शारीरिक आणि मानसिक विकासासाठी फायदेशीर असते. पण पाच वर्षाच्या मुलांनी किती वेळ योगा करावा हे जाणून घेऊया.
Child Yoga Tips:
Child Yoga Tips:Sakal
Updated on

Child Yoga Tips: लहान मुलांच्या चांगल्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी व्यायाम करणे आरोग्यदायी ठरतो. पण लहान मुलांना किती वेळ आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम करायचा हे समजणे पालकांसाठी अवघड असू शकते. चला तर मग जाणून घेऊया पाच वर्षापर्यंतच्या मुलांनी किती वेळ आणि कोणता योगा करावा.

नियमितपणे खेळावे

मुलांनी दररोज किमान एक तास खेळले पाहिजे. यामध्ये धावणे, उडी मारणे आणि पळणे यांचा समावेश असू शकतो. हे उपक्रम मुलांना निरोगी आणि आनंदी ठेवण्यास मदत करतात. खेळताना मुले फक्त मजा करत नाहीत तर निरोगी राहतात.

जेवणाची वेळी

एक वर्षापर्यंतच्या मुलांना दररोज किमान 30 मिनिटे टमी टाईम द्यावा. टमी टाईम म्हणजे बाळाला पोटावर ठेवणे आणि त्यांना त्यांचे हात आणि पाय हलवू देणे. हे मुलाचे डोके, मान आणि शरीर मजबूत करण्यास मदत करते. पण असे करताना मुलांकडे लक्ष दिले पाहिजे.

1 ते 5 वर्षातील मुलांसाठी योगा

1 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांचा शारिरिक आणि मानसिक विकास होण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी नियमितपणे योगा करणे गरजेचे आहे. या वयातील मुलांनी दररोज किमान तीन तास व्यायम केला पाहिजे.

मुलांनी शारीरिक क्रीया कोणत्या कराव्या

चालणे आणि धावणे

मुलांना उद्यानात किंवा घराच्या अंगणात मोकळेपणाने चालण्याची आणि धावण्याची सवय लावावी. यामुळे मुलांचे पाय मजबूत होतात आणि ते ऊर्जावान राहतात.

शर्यतीत धावणे

मुलांसोबत छोट्या धावण्याच्या शर्यती लावा. यामुळे मजा तर येतेच शिवाय त्यांचा स्टॅमिनाही वाढतो.

पोहणे

मुलांना पोहायला शिकवावे. ही संपूर्ण शारीरिक कसरत असून मुलांची फुफ्फुसे आणि स्नायू मजबूत होतात.

नृत्य

मुलांना संगीतावर नाचायला शिकवावे. हे केवळ मनोरंजकच नाही तर त्यांचे स्नायू देखील मजबूत होतात.

दोरीवरच्या उड्या

मुलांना हलका दोरीवर उडी मारायला शिकवावे. त्यामुळे त्यांचे शरीर लवचिक आणि मजबूत बनते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.