Yoga Tips : आपल्या शारिरीक अन् मानसिक आरोग्यासाठी योगासने फायदेशीर आहेत. सर्व वयोगटातील व्यक्ती योगासनांचा नियमित सराव करू शकतात. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध महिला अन् पुरूषांपर्यंत सर्वजण योगाच्या मदतीने निरोगी राहू शकतात.
परंतु, अनेक नोकरदार महिलांना किंवा गृहिणींना रोजच्या कामातून स्वत:साठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे, लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, गुडघेदुखी इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते.