तुमचे पाय देतील मधुमेहाचे संकेत, ही लक्षण दिसताच करा Blood Sugar टेस्ट

Diabetes symptoms in Marathi: मधुमेहाचं निदान झाल्यानंतर आपलं शरीर ठराविक संकेत देऊ लागतं. वेळीच हे संकेत किंवा लक्षण तुमच्या लक्षात आली तर काही गोष्टी नियंत्रणात आणणं शक्य होतं
diabetes symptoms
diabetes symptomsEsakal
Updated on

Diabetes causes and symptoms: मधुमेह हा आजार सध्याच्या काळात मोठी समस्या बवत चालला आहे. मधुमेहावर अद्याप कोणतेही उपचार Remedies उपलब्ध नाहीत. केवळ काही औषधोपचार आणि पथ्य पाळून मधूमेह नियंत्रणात ठेवणं शक्य आहे.

अनेकदा मधुमेहामुळे इतर आजारांचा Illtess धोका वाढण्याची शक्यता असते. काही वेळेस मधुमेहामुळे काही गंभीर समस्यादेखील निर्माण होवू शकता. Your legs will give indications of Diabetes be Aware

बदलत्या जीवनशैली सोबतच अनेकदा अनुवांशिक कारणांमुळे मधुमेहाचा Diebetesआजार जडतो. अलिकडे तर अगदी कमी वयातच मधुमेहाचा त्रास अनेकांमध्ये दिसून येतो. मधुमेहाची समस्या केव्हा सुरू होईल हे सांगता येत नाही. यासाठीच त्याची प्राथमिक लक्षणं Symptoms ठाऊक असणं गरजेचं आहे. 

मधुमेहाचं निदान झाल्यानंतर आपलं शरीर ठराविक संकेत देऊ लागतं. वेळीच हे संकेत किंवा लक्षण तुमच्या लक्षात आली तर काही गोष्टी  नियंत्रणात आणणं शक्य होतं.

मधुमेह झाल्यानंतर आपल्या पायांमध्ये काही बदल घडून येतात. पायाच्या माध्यमातून मिळणारे हे संकेच ओळखून लगेच ब्लड शुगरची तपासणी केल्यास मोठा धोका टाळणं शक्य आहे. 

पायांमध्ये वेदना- जेव्हा तुम्हाला मधुमेहाची लागण होते तेव्हा तुम्हाला डायबेटिक न्यूरोपशी होण्याची शक्यता असते. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये नसा डॅमेज होतात. यामुळे पायांमध्ये प्रचंड वेदना निर्माण होवू शकतात. तसचं पायांना सूजही येऊ शकते. काही वेळाला तर यामुळे पाय सुन्न पडू शकतात. 

नखांचा रंग बदलणे- डायबिटीजच्या लक्षणांमध्ये एक म्हणजे नखांचा रंग बदलणे. मधुमेहाचा लागण झाल्यावर नखांचा रंग बदलतो. नेहमी गुलाबी किंवा लालसर दिसणारी नखं अचानक काळी दिसू लागतात. त्यामुळे हे लक्षण दिसतात त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्ल्याने रक्ताच्या तपासण्या करा. 

हे देखिल वाचा-

diabetes symptoms
Sun Stroke Symptoms : उष्मघाताची 'ही' लक्षणे वेळीच ओळखा, नाहीतर एक चूक पडू शकते महागात

त्वचेचा पोत बदलणं- जेव्हा मधुमेह होतो तेव्हा पायांची आणि तळव्यांची त्वचा कठीण होवू लागते. काही वेळेस चुकीच्या चपलांमुळे किंवा काही कामांमुळे देखील हे होण्याची शक्यता असते. मात्र तरी तुम्हाला अचानक हा बदल जाणवल्यास त्वरित तपासण्या करा. यामुळे पुढील धोका कमी होऊ शकतो. 

पायांमध्ये अल्सर- अचानक वेळो वेळी फूट अल्सर होत असेल म्हणजेच पायांमध्ये जखमा होत असतील. तसचं त्वचा सारखी निघत असेल तर हे देखील मधुमेहाचं एक लक्षण असू शकतं. काही वेळेस या जखमा प्रचंड वाढू शकतात आणि पाय कापण्याची वेळ येऊ शकते. 

त्यामुळे सामान्य लक्षण दिसताच ब्लड शुगरची तपासणी करून औषधौपचार सुरु केल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं. 

कॉर्न्स आणि कॉलस- मधुमेहामध्ये पायांमध्ये कार्न्स आणि कॉलसची समस्या उद्भवू लागते. जेव्हा एखाद्या ठिकाणच्या त्वचेवर जास्त दाब येतो किंवा ती घासली जाते तेव्हा कॉर्न्स आणि कॉलसची समस्या निर्माण होते. या ठिकाणची त्वचा कडक आणि जाड होते. 

नखांमध्ये इंफेक्शन- डायबेटीजच्या रुग्णांमध्ये नखांमध्ये फंगल इंफेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. याला ऑनिकोमाइकोसिस नावाने ओळखलं जातं.

साधारण अंगठ्याच्या बोटाला हे होण्याची शक्याता जास्त असते. यामध्ये पायाच्या बोटांची नखं आपोआप तुटू लागतात. 

diabetes symptoms
Diabetes Causes: साखरेने नव्हे तर या पदार्थांमुळे होते डायबिटीस

गँगरीन- मधुमेहाचा रक्तपेशींवरही परिणाम होतो ज्यामुळे बोटांना आणि पायांना रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा खूप कमी होतो किंवा काही वेळेस तो जवळपास पूर्ण थांबतो.

जेव्हा रक्तप्रवाह पूर्ण थांबतो किंवा टिशू मरुन जातात तेव्हा गँगरीन होतो. या स्थितीमध्ये अनेकदा पाय कारण्याची वेळ येऊ शकते. 

त्यामुळे तुमच्या पायांकडे देखील दूर्लक्ष करू नका. मधुमेहाची साधारण लक्षण दिसताच रक्तातील शुगरची तपासणी करा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.