Kacchi Kairi Health Benefits : आंबट चिंबट कैरी मोठी फायद्याची, उन्हाळ्यात आवर्जून खा; वाचा फायदे

या आंबट चिंबट कच्च्या कैऱ्या खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे काय? फायदे वाचून तुम्हीही लगेच कच्ची कैरी विकत घ्याल
Kacchi Kairi Health Benefits
Kacchi Kairi Health Benefitsesakal
Updated on

Kacchi Kairi Health Benefits : भारतातत ऋतूनुसार फळांची विक्री दिसून येते. त्याचे आरोग्यदायी फायदेसुद्धा अनेक आहे. मार्च महिन्याला सुरुवात झाली असून तापमानातसुद्धा वाढ झाली आहे. बाजारात तुम्हाला या काळात कच्च्या कैऱ्या दिसून येतात. मात्र या आंबट चिंबट कच्च्या कैऱ्या खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे काय? फायदे वाचून तुम्हीही लगेच कच्ची कैरी विकत घ्याल.

कैरी (Kairi), आवळा मीठ लावून खायला अनेकांना आवडते. कैरीचं आंबट लोणचं (Pickle) लोक आवडीने खातात. लहान मुलं झाडावरची कैरी तोडून मीठ लावून घातात. तर कैरीचे पन्हे देखील तयार केलं जातं. कैरी खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात बहुतेकांच्या घरी तुम्हाला कैरीचे पने बनवताना लोक दिसतील. उन्हाळ्यात उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक कैरीच्या पन्याचा वापर करतात.

कैरीमध्ये असतात हे पोषक तत्व

कैरीमध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सीमुळे इम्युनिटी वाढते. त्यामुळे तुम्हाला जर शरीरातील इम्युनिटी वाढवायची असेल तर तुम्ही कैरी खाऊ शकता. कैरीमध्ये कॅरोटीनॉईड मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.

हृदयविकाराचा धोका कमी होतो

कैरीमध्ये व्हिटॅमिन बी (Vitamin B) आणि फायबर असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन (Blood Circulatory System) योग्य पद्धतीने होते. परिणामी हृदयविकाराचा धोका कमी होतो.

पचनशक्ती वाढते

कैरी खाल्ल्यानं पचन क्रिया सुधारते. अपचन किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही कैरी खाऊ शकता. तसेच प्रेग्नन्सी मॉर्निंग सीकनेस आणि मळमळ जाणवत असेल, तरी देखील महिला कैरी खाऊ शकतात. कैरीमध्ये आढळणारे झेक्सॅन्थिन हे अँटीऑक्सिडंट डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. हे डोळ्यांचे मॅक्युलर डिजनरेशनपासून संरक्षण करते.

Kacchi Kairi Health Benefits
Raw Mango Facepack | टॅनिंग घालवण्यासाठी वापरा हा घरगुती फेसपॅक! | Sakal Media |

उन्हाळ्यात का खावी कैरी?

मॉर्निंग सीकनेस, बद्धकोष्ठता, अपचन, शरीरात वाढणारी उष्णता इत्यादी समस्या तुम्हाला (Health News) उन्हाळ्यात जाणवल्यास तुम्ही कैरी खाऊ शकता. तसेच कैरीचं पन्ह देखील तुम्ही उन्हाळ्यात पिऊ शकता. कैरीचं पन्ह उन्हाळ्यात प्यायल्याने शरीरातील उष्णतेचे परिणाम कमी होते.

तसेच शरीरातील डिहायड्रेशन देखील कमी होते. कैरीचं सॅलेड देखील तुम्ही तयार करु शकता. कैरीचं सॅलड तयार करण्यासाठी स्विट कॉर्न, टोमॅटो आणि कैरी कापून मिक्स करा. या सॅलेटवर तुम्ही मीठ टाकू शकता किंवा या सॅलेडमध्ये तुम्ही काळं मीठ देखील मिक्स करु शकता. तसेच तुम्ही कैरीची चटणी देखील खाऊ शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.