Zika Virus In Pune : पुण्यात का वाढतोय झिका विषाणूचा धोका? गर्भवती महिलांनी काय घ्यावी काळजी? घ्या जाणून

Zika Virus In Pune : पुण्यामध्ये झिका व्हायरसने डोकेदुखी वाढवली असून, आता रूग्णसंख्या ३ वर जाऊन पोहचली आहे.
Zika Virus In Pune
Zika Virus In Puneesakal
Updated on

Zika Virus In Pune : पुण्यामध्ये झिका व्हायरसने डोकेदुखी वाढवली आहे. ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात बुधवारी झिकाचे २ रूग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या रूग्णांमध्ये भर पडली असून, हडपसर परिसरात एका व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाल्याचे नुकतेच समोर आले आहे.

परिणामी, झिका व्हायरसच्या रूग्णांची संख्या आता २ वरून ३ झाली आहे. डासांमार्फत पसरणारा हा झिका व्हायरस नेमका आहे तरी काय? आणि त्यापासून बचाव करण्यासाठी गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Zika Virus In Pune
Zika Virus: पुण्यात सापडले 'झिका'चे 2 रुग्ण; काय काळजी घ्याल ?

झिका व्हायरस नेमका काय आहे?

झिका विषाणू हा डासांमार्फत पसरणारा आजार असून, तो सर्वात पहिल्यांदा १९४७ मध्ये युगांडाच्या झिका जंगलात आढळला होता. त्यामुळे, हा आजार झिका व्हायरस या नावाने ओळखला जाऊ लागला.

त्यानंतर, अमेरिका आणि विशेषत: ब्राझीलमध्ये या व्हायरसचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला होता. अमेरिकेत २०१५ मध्ये या आजाराचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्यामुळे, त्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते.

झिका व्हायरसचा गर्भवती महिलांना धोका?

२०१५ मध्ये आरोग्याच्या दृष्टीकोनातून या आजाराबाबत गंभीर इशारा देण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे या आजाराचा उद्रेक मायक्रोसेफलीसह जन्मलेल्या बाळांच्या वाढीशी संबंधित होता. या आजाराची लागण जर गरोदर महिलेला झाली तरी त्याचा परिणाम गर्भावर होण्याची शक्यता असते.

ज्यामुळे, जन्माला येणारे लहान मूल हे असामान्य जन्माला येते, जसे की, लहान डोके घेऊन बाळ जन्माला येते किंवा अविकसित मेंदू असलेले बाळ जन्माला येते. त्यामुळे, या आजाराचा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांना अधिक प्रमाणात आहे आणि या विषाणूचा त्यांच्या संततीवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी माहिती नवी दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलचे डॉ. जतिन आहुजा यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.

गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी?

  • झिका विषाणूचा संसर्ग रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डासांपासून स्वत:चा बचाव करणे.

  • घराच्या आसपास आणि घरात स्वच्छता ठेवा.

  • घराजवळ पाणी साचू देऊ नका.

  • रात्री झोपताना मच्छरदाणीचा अवश्य उपाय करा.

  • मच्छरांचा प्रतिबंध करणाऱ्या गोष्टींचा वापर करणे.

  • झिका व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लांब बाह्यांचे कपडे परिधान करा. जेणेकरून मच्छरांपासून बचाव होईल.

  • ज्या भागात झिका व्हायरसचा प्रादूर्भाव झाला आहे त्या भागात गर्भवती महिलांनी जाणे टाळावे.

  • जर त्या ठिकाणे जाणे गरजेचे असेल तरी ही प्रवास काही दिवसांसाठी पुढे ढकलावा.

  • गर्भवती महिलांनी रक्त तपासणी आणि झिका व्हायरसची चाचणी अवश्य करावी.

  • जेणे करून रक्तातील संक्रमणाद्वारे त्याचा होणारा संसर्ग रोखता येईल.

  • वेळोवेळी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी.

Zika Virus In Pune
Nagpur Zika Virus Update : झिकाचा धोका ओळखून नागपूर शहरात अलर्ट; डासांची उपत्तीस्थाने नष्ट करण्याच्या सूचना

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.