Zika Virus Diet : झिका व्हायरसपासून लवकर बरे होण्यासाठी आहाराची कशी काळजी घ्यायची? जाणून घ्या

Zika Virus Diet : कोणत्याही आजारातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी औषधोपचारांसोबतच संतुलित आहार तितकाच महत्वाचा आहे.
Zika Virus Diet
Zika Virus Dietesakal
Updated on

Zika Virus Diet : सध्या पुण्यात झिका व्हायरसने नागरिकांची चिंता वाढवली आहे. बुधवारी पुण्यात झिका व्हायरसचे २ रूग्ण आढळल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात आज हडपसरमध्ये आणखी एका रूग्णाला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे, पुण्यातील रूग्णसंख्येत भर पडली असून बाधित रूग्णांची संख्या ३ झाली आहे.

कोणत्याही आजारातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी औषधोपचारांसोबतच संतुलित आहार देखील महत्वाची भूमिका बजावतो. पौष्टिकतेने समृद्ध असलेला आहार शरीराला ऊर्जा तर देतोच पण तो आतून आपल्याला निरोगी बनवतो.

जेव्हा एखादी व्यक्ती झिका व्हायरसपासून बरी होत असते, तेव्हा तुम्ही आहाराची योग्य ती काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. झिका या विषाणूपासून लवकरात लवकर बरे होण्यासाठी तुम्ही आहाराची कशी काळजी घ्यायची? त्याबददल न्यूज18 हिंदीशी बोलताना नवी दिल्लीच्या डॉ. सोनिया रावत यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या आहारासंदर्भातल्या काही गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

Zika Virus Diet
Zika Virus In Pune : पुण्यात का वाढतोय झिका विषाणूचा धोका? गर्भवती महिलांनी काय घ्यावी काळजी? घ्या जाणून

शरीर हायड्रेटेड ठेवा

झिका व्हायरसची लागण झाल्यानंतर तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवणे फार महत्वाचे आहे. निरोगी आरोग्यासाठी आणि कोणत्याही आजारातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी पुरेसे पाणी पिणे फायदेशीर आहे.

खास करून जेव्हा तुमचे शरीर एखाद्या संसर्गाशी लढा देत असते, तेव्हा आपल्या शरीराला अधिक प्रमाणात द्रवपदार्थांची आवश्यकता असते. जेणेकरून आपल्या शरीरातील विषारी घटक आणि संसर्ग बाहेर काढता येतील.

द्रवपदार्थांचा आहारात करा समावेश

शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्यासोबतच नारळपाणी, लिंबू पाणी आणि फळांचे ज्यूस इत्यादी द्रवपदार्थांचा आहारात जरूर समावेश करा. तसेच, काकडी आणि संत्र्यांचा आहारात अवश्य समावेश करा.

यामध्ये अधिक प्रमाणात पाणी असते. रूग्णाला आजारी पडल्यावर पुरेशी भूक लागत नाही आणि तोंडाची चव ही जाते. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने आणि द्रवपदार्थांचा आहारात समावेश केल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

आहारात प्रथिने महत्वाची

झिका विषाणूची लागण झाल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील स्नायू कमजोर होऊ लागतात. त्यामुळे, रूग्णाला अशक्तपणा जाणवू शकतो. या परिस्थितीमध्ये लवकर बरे होण्यासाठी रूग्णाच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवावे.

कारण, प्रथिने आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाची आहेत. शरीरातील पेशी आणि स्नायूंच्या सुधारणेसाठी प्रथिने महत्वाची भूमिका बजावतात. यासाठी तुम्ही आहारात, डाळी, काजू, हिरव्या पालेभाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करू शकता.

Zika Virus Diet
Zika Virus: पुण्यात सापडले 'झिका'चे 2 रुग्ण; काय काळजी घ्याल ?

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.