Annual Horoscope 2024 - कन्या रास : 'उजळेल भाग्य, पण जपा आरोग्य'; वर्षभरात कशी असेल आपली 'रास'

राशिचक्रातील सहावी अत्यंत बुद्धिमान रास म्हणजे कन्या (Virgo Rashi) होय.
Annual Horoscope 2024 Virgo Rashi Kanya Rashi
Annual Horoscope 2024 Virgo Rashi Kanya Rashiesakal
Updated on
Summary

जीवनात कितीही कटू प्रसंग आले, तरी उत्तरेकडे तोंड करून विचार केल्यास तुमच्या कोणत्याही समस्यांवर अचूक उत्तर मिळेल.

-आनंद एस. मत्तीकोप-कुलकर्णी बेळगाव.

Annual Horoscope 2024, Kanya Rashi : राशिचक्रातील सहावी अत्यंत बुद्धिमान रास म्हणजे कन्या (Virgo Rashi) होय. जीवनात संकटे ही येणारच; पण त्यावर मात करून योग्य मार्ग शोधणारी व्यक्तीच बावनकशी सोन्याप्रमाणे जीवनात चमकते, हे सिद्ध करणारी ही रास. घराचा पाया डळमळीत असेल, तर इमारत उभी राहत नाही, या तत्त्वानुसार प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाणे, जीवनातील कायमचे ऐश्वर्य, स्थैर्य, सातत्य, पैसा राखून ठेवण्याची वृत्ती.

या साऱ्यांचा संगम झाल्यास कितीही अवघड काम असेल, तर ते सहज पार पाडू शकता; पण यातील एखादी गोष्ट जर कमी असेल, तर कोणत्याही कामात लवकर यश मिळत नाही. दरम्यान, यावर्षी भाग्यस्थ गुरूमुळे सर्वत्र भाग्य उजळेल. आर्थिक समस्याही (Financial Problems) दूर होतील.

Annual Horoscope 2024 Virgo Rashi Kanya Rashi
Annual Horoscope 2024 - सिंह रास : जीवनाला कलाटणी अन् भाग्योदयाची संधी; वर्षभरात कसं असेल आपलं 'राशिभविष्य'

जानेवारी : काही धार्मिक कार्ये व पूजाअर्चा केल्यास महत्त्वाचे शुभशकुन घडतील. पूर्वीचे वैमनस्य या महिन्यात डोके वर काढण्याची शक्यता दिसते. नोकरीत असाल, तर जे काही काम पडेल ते नाकारू नका; अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम जाणवतील.

-------------------------------------

फेब्रुवारी : लाभदायक आणि आशादायक ग्रहमान आहे. काही महत्त्वाची कामे हाती घेऊन ती पूर्ण करू शकाल. संततीच्या बाबतीत महत्त्वाच्या घटना घडतील. आर्थिक प्राप्ती झाली, तरी खर्चही तसाच वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी व काही गैरसमज या महिन्यात कमी होतील.

Annual Horoscope 2024 Virgo Rashi Kanya Rashi
राशीचक्रातल्या या 6 राशी असतात अध्यात्मिक, तुमची रास आहे का त्यात?

मार्च : आर्थिक अडचणी कमी होतील. औषधपाणी घेताना जरा नीट लक्ष द्यावे लागेल. सरकारी क्षेत्र, थोरामोठ्यांच्या ओळखीतून काहीतरी नवीन कामे मिळतील. महत्त्वाच्या आर्थिक कामासाठी प्रवास घडतील. नेहमीच्या कामकाजात थोडासा बदल करावा लागेल. काही बाबतीत नवे धोरण स्वीकारावे. कुटुंबात मंगलकार्याच्या दृष्टीने वाटाघाटी सुरू होतील. काहीतरी नवीन करून दाखविण्याची इच्छा पूर्ण होईल.

-------------------------------------

एप्रिल : घरादाराच्या बाबतीत काही कामे अडलेली असतील, तर ती पूर्ण होतील. नोकरीत उच्चपद प्राप्तीचे योग; पण ग्रहांचे भ्रमण काही बाबतीत विचित्र असल्याने तुमची चूक नसतानाही कुणीतरी मुद्दाम तुम्हाला त्यात गोवण्याचा प्रयत्न करतील. अशा घटनांपासून सावध राहावे लागेल.

मे : स्वतःच्या वास्तूचे स्वप्न पूर्ण होईल. मंगळ-नेपच्यूनचा प्रभाव अनेक समस्या सोडविण्यास कारणीभूत ठरेल. आर्थिक कमाई आणि खर्च यांचा मेळ राहणार नाही. कुठे खर्च करावा, तेही कळणार नाही. घरगुती मतभेद असतील, तर ते वेळीच संपवा; अन्यथा विकोपाला जातील. स्वतःच्या मनाने कोणतीही रिपेअरी अथवा दुरुस्ती करण्यास जाऊ नका. त्यातून वेगळेच काहीतरी निष्पन्न होईल.

----------------------------

जून : सरकारी क्षेत्रात असाल, तर पूर्वीची काही प्रकरणे उघड होतील. त्यात तुम्ही अडकणार नाही यासाठी जपावे लागेल; पण कुठेतरी पुण्याई कामाला येते या म्हणीप्रमाणे ऐनवेळी कुणीतरी व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. नातेवाईक आणि शेजारीपाजाऱ्यांशी जेवढ्यास तेवढेच संबंध ठेवा. कारण, तुमच्या चांगुलपणाचा कुणीही कसाही फायदा घेऊ शकतात.

Annual Horoscope 2024 Virgo Rashi Kanya Rashi
Mangalvar Upay: या राशी आहेत हनुमंताला प्रिय, मंगळवारी करा हे उपाय, कायम बरसेल कृपा

जुलै : रवी-हर्षलची उत्तम साथ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे अपेक्षाही नसेल, अशा ठिकाणी नोकरी मिळेल किंवा लग्न जुळेल. कर्जफेडीचे प्रसंग असतील, तर अचानक कुठून तरी पैसा मिळेल. त्यातून कर्जमुक्त व्हाल. माता-पिता, सासू-सासरे यांच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. मात्र, त्यात कटूता येणार नाही, याची काळजी घ्या.

--------------------------------

ऑगस्ट : पूर्वी जर कुणाला जामीन राहिला असाल, तर त्यातून शक्यतो लवकर बाहेर पडा. कर्जबाजारीपणा, नैतिक अधःपतन, शेतीसाठी वादावादी असे नको ते प्रकार घडू शकतात. त्यासाठी सावध राहावे लागेल. सरकारी कामे असतील, तर ती पटापट होतील. कोणत्याही परिस्थितीत कुटुंबातील ऐक्य बिघडणार नाही यासाठी जपावं लागेल. मोठ्या कंत्राटी कामाशी संबंध असेल, तर विघ्नसंतोषी लोकांच्या कारवायाकडे लक्ष ठेवा. मुला-बाळांच्या बाबतीत काही चांगल्या घटना घडतील.

सप्टेंबर : विवाह, नवीन संस्था स्थापन करणे, धनलाभ, मित्रमंडळाचे सहकार्य अशा प्रत्येक बाबतीत यश मिळण्याच्या दृष्टीने चांगले अनुभव येतील. तरीही काही बाबतीत बेसावध राहू नका. गुरूचे भ्रमण शुभ असल्याने कोणत्याही बाबतीत आर्थिक अडचण येणार नाही. तुम्ही दिलेल्या सल्ल्यामुळे अनेकांना फायदा होईल. धार्मिक क्षेत्रात असाल, तर पुढील घटना आगाऊ समजतील. या महिन्यात मानसिक संभ्रम वाढविणाऱ्या काही अकल्पित घटनाही जाणवतील.

-------------------------------------

ऑक्टोबर : जमीनजुमला, शेती, वाहन, कोर्टकचेरी यांच्याशी संबंध असेल, तर चांगले यश मिळवाल. घराण्यातील कुणीतरी पूर्वज कुणाच्यातरी रूपाने येऊन तुम्हाला काही संकेत देतील. त्यामुळे कुटुंबातील बऱ्याच गूढ गोष्टी समजतील. मादक पदार्थ, विषारी द्रव्य यांच्यापासून जरा सावध राहावे लागेल.

नोव्हेंबर : यावर्षी गुरूच्या कृपादृष्टीमुळे कल्पनाही केला नसाल, असे उत्तम यश मिळवाल. ध्यानीमनी नसताना लग्न ठरू शकेल. सर्व कामात यश मिळेल. मतभेद, ताटातूट वगैरे झाली असेल, तर सर्व गैरसमज दूर होऊन पुन्हा एकत्र येऊ शकाल. पोटाचे विकार, वाहन बिघडणे, नातेवाईकांकडून त्रास यांचाही अनुभव येईल.

-------------------------------------

डिसेंबर : काही महत्त्वाची कामे पटापट होऊ लागतील. या महिन्यातील २० ते २२ हे तीन दिवस अतिशय महत्त्वाचे ठरतील. काही कामासाठी प्रवास करावा लागेल. व्यवसायादृष्टीने महत्त्वाच्या वाटाघाटी या महिन्यात होतील; पण त्याचा फायदा मात्र काही काळानंतर होईल.

Annual Horoscope 2024 Virgo Rashi Kanya Rashi
Happy New Year 2024  :  नव्या वर्षात भाग्यवान आहेत या राशी, नशिब पालटणार अन् खिसा होणार धन-धना-धन

विष्णूची कृपा असणारी कन्या रास

विष्णूची कृपा असणारी कन्या ही रास असून, शुभ दिशा उत्तर आणि कुबेराचे भांडार या बाबी आपण लक्षात ठेवाव्यात. जीवनात कितीही कटू प्रसंग आले, तरी उत्तरेकडे तोंड करून विचार केल्यास तुमच्या कोणत्याही समस्यांवर अचूक उत्तर मिळेल. राहत्या वास्तूत उत्तरेकडे कोणत्याही प्रकारची अडचण, लोखंड, मनाला उद्वेग आणणाऱ्या वस्तू ठेवू नका. त्याऐवजी एखादे निसर्गाचे चित्र लावल्यास त्याचा चांगला फायदा होईल; पण उत्तरेकडे चुकूनही घड्याळ ठेवू नका. घराच्या आसपास कुठेही बेलफळ, जाई आणि पायरी यांची झाडे लावल्यास जीवनात सुख-समृद्धीचे वारे वाहू लागतील.

यावर्षी घरात मंगलकार्याच्या वाटाघाटी सुरू होतील. मुला-बाळांच्या बाबतीत असलेल्या समस्या दूर होतील. मुलं ऐकत नसतील, तर या वर्षापासून त्यांच्यात बराच चांगला बदल झालेला दिसून येईल. आर्थिक बाबतीतही हे वर्ष उत्तम आहे. शनीचे भ्रमण सर्व कामात यश येणारे असले, तरी आरोग्याच्या बाबतीत चांगले नाही. दीर्घकालीन आजार संभवतात. पथ्यपाणी व्यवस्थित ठेवा. कुठेही कोणत्याही कारणास्तव शत्रू निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्या. राहू-केतूचे भ्रमण यावर्षी तुमच्या जीवनाला अत्यंत महत्त्वाची कलाटणी देणार आहे. आतापर्यंत कल्पनाही केला नसाल, अशा काही गोष्टी यावर्षी घडतील. हर्षल अशुभस्थानी आहे. एखादे नको ते धाडस जीवावर येऊ शकेल. खाताना, पिताना, प्रवास करताना, लिहिताना किंवा व्यवहारात जास्तीत जास्त सावधगिरी बाळगा. नेपच्यूनचे भ्रमण व्यसन आणि व्यसनी मित्र यांच्यापासून दूर राहा, असे सुचवित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.