weekly horoscope 11th august to 17th august 2024
weekly horoscope 11th august to 17th august 2024esakal

साप्ताहिक राशिभविष्य : (११ ऑगस्ट २०२४ ते १७ ऑगस्ट २०२४)

सध्याच्या युगातील माणसाचं अस्तित्व हे नेमकं असतं तरी काय? हा एक मोठा प्रश्‍नच होऊन बसला आहे. हल्ली माणसाला वजनकाट्यावर भलं मोठं वजन असूनही समाजात वजन नसतं म्हणे.
Published on

राजकारण, वादविवाद टाळा

मेष : सप्ताहात शनिमंगळ केंद्रयोगाची पार्श्‍वभूमी राहील. कोणताही जुगार नको. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरीतील राजकारणापासून दूर राहावे. पोटाच्या विकारापासून जपावे. अश्‍विनी नक्षत्राच्या तरुणांनी मित्रांशी वादविवाद टाळावेत. बाकी सप्ताहाची सुरुवात एकूणच आपल्या राशीस वैवाहिक जीवनातून सुवार्तातून प्रसन्न ठेवेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी भाजण्या-कापण्यापासून सावध राहावे.

नोकरी मिळण्याची शक्यता

वृषभ : सप्ताहात नोकरदारांना नोकरीत ताणतणाव येऊ शकतो. एकूणच नोकरीत क्रिया-प्रतिक्रिया जपा. बाकी सप्ताहात तरुणांना विशिष्ट छंद किंवा उपक्रमांतून साथ देणारे ग्रहमान आहे. काहींची शैक्षणिक चिंता जाईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींचे एखादे वादग्रस्त न्यायलयीन प्रकरण सुटेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी देणारा सप्ताह. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी बुधवार वैयक्तिक सुवार्ताचा ठरेल.

नव्या ओळखी लाभदायक

मिथुन : मोठ्या ग्रहांच्या ग्रहयोगांतून आचारसंहिता पाळायला लावणारे ग्रहमान पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींनी सार्वजनिक जीवन सांभाळावे. भाऊबंदकी सांभाळा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात मोठी रंजक राहील. गाठीभेटीतून भाग्यबीजं पेरली जातील. नव्या ओळखींतून लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विवाहयोगाचा.

राजकारणापासून दूर राहा

कर्क : सप्ताहात तरुणांना स्पर्धात्मक यशातून मोठा दिलासा मिळेल. उत्तम नोकरीच्या संधी येतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना कर्ज मंजुरीतून लाभ. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखीतून विवाहस्थळं येतील. सप्ताहात आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शनी-मंगळ केंद्रयोगाच्या पार्श्‍वभूमीवर विचित्र लक्षणे दाखवू शकते. राजकारणापासून दूर राहा. सप्ताहाचा शेवट कुपथ्यातून त्रासाचा.

परदेशात नोकरीचा लाभ शक्य

सिंह : सप्ताहातील ग्रहमान स्वतंत्र व्यावसायिकांना छानच. सरकारी कामं होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील शुक्रभ्रमण आणि गुरुभ्रमणाची साथ लाभेल. नोकरीतलं आनंदी वातावरण मन प्रसन्न ठेवेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशात नोकरीचा लाभ शक्य. शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. विशिष्ट संशोधनात यश प्राप्त होईल. मात्र सप्ताहात प्रवासात चोरी, नुकसानीपासून सावध.

आचारसंहितेचे पालन करा

कन्या : ग्रहांचं फिल्ड शनी-मंगळ केंद्रयोगातून प्रक्षुब्ध राहील. घरात वडीलधाऱ्यांशी वाद टाळा. सप्ताहात सरकारी कायदेकानू पाळलेलेच बरे. सिग्नल तोडू नका. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी आचारसंहिता पाळावीच. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात एखाद्या वेदनायक व्याधीतून त्रास होऊ शकतो. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात नोकरीत आनंददायी ठरेल.

व्यावसायिकांना अनुकूल कालखंड

तूळ : सप्ताहात वृद्धांना आरोग्यविषयक बाबींतून त्रास होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी सर्व प्रकारांतून पथ्ये पाळावीत. सप्ताह गर्भवतींना संवेदनशील वाटतो. बाकी सप्ताह व्यावसायिक पार्श्‍वभूमीवर छानच. सप्ताहाच्या सुरुवातीस महत्त्वाचे करारमदार करावेत. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार व्यावसायिक उत्सव वा प्रदर्शनांतून मोठा लाभदायी ठरणारा असेल. सोमवार वसुलीचा ठरेल.

मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या

वृश्‍चिक : सप्ताह बुद्धिजीवी मंडळींना उत्साहवर्धकच राहील. ता. १० ते १४ हे दिवस नोकरीतील घटनांतून प्रसन्न ठेवणारे. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना बढतीची चाहूल लागेल. तरुणांना उत्तम नोकरीचा लाभ होईल. वैवाहिक जीवनातील विशिष्ट प्रश्‍न सुटतील. पती वा पत्नीला उत्तम नोकरी मिळेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी उत्सव वा समारंभातून मौल्यवान वस्तू जपाव्यात.

नोकरीत वातावरण प्रसन्न राहील

धनु : सप्ताहातील ग्रहयोगाची पार्श्‍वभूमी जरा विचित्रच. सतत बेरंग होतील. चीजवस्तूच्या नुकसानीचे प्रसंग अस्वस्थ करतील. घरात सतत वादाचे मुद्दे निघू शकतात. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींनी सतत शांत राहावे व प्रसंगावधान राखावे. बाकी सप्ताहातील बुध-शुक्रांची स्थिती नोकरीतील पर्यावरण छानच ठेवेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार विशिष्ट भाग्यसंकेत देणारा.

आर्थिक पथ्ये पाळावीत

मकर : मोठ्या ग्रहांचे योग मानसिक, शारीरिक, आर्थिक संदर्भातून पथ्ये पाळण्यास लावतील. नातेवाइकांशी टोकाचे वाद होऊ शकतात. बाकी सप्ताहात ता. १२ ते १४ हे दिवस मोठे प्रवाही राहतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना मुलाखतीतून यश मिळेल. नोकरीत कर्तृत्व गाजवाल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना जाहिरात माध्यमातून यश मिळेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार दैवी चमत्कार दाखवणारा.

दुखापतींपासून काळजी घ्या

कुंभ : सप्ताहातील शनी-मंगळ केंद्रयोग बेरंग करणारा ठरू शकतो. उत्सव, समारंभातून काळजी घ्या. काहींना शारीरिक दुखापती शक्य. बाकी सप्ताहातील शुभग्रहांची कनेक्टिव्हिटी राहीलच. उमलत्या तरुणाईला सप्ताहाची सुरुवात छानच. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग. शैक्षणिक चिंता जाईल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार दैवी प्रचितीचा. हृदयातले एखादे शल्य जाईल. श्रद्धा बळकट होईल.

संमिश्र काळ पण संकट टळेल

मीन : परस्परविरोधी ग्रहमान राहील. सप्ताह स्त्रीवर्गास जाचक. नवपरिणितांना सासुरवास होऊ शकतो. अर्थातच वागणं-बोलणं सांभाळा. बाकी सप्ताहात नोकरी-व्यावसायिक पर्यावरण ठीकच राहील. उत्तरा-भाद्रपद नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १२ ते १४ हे दिवस महत्त्वाच्या कामांतून गती घेणारेच. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ चा बुधवार संकटमोचनाचा. पुत्रोत्कर्षाचा कालखंड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com