साप्ताहिक राशिभविष्य : (१६ जून २०२४ ते २२ जून २०२४)

सृष्टीच्या आदिसंकल्पाच्या बीजरूप धारणेशी वड, पिंपळ आणि औदुंबर या पुण्यवृक्षांचा संबंध येतो. अर्थातच हे पुण्यवृक्ष या सृष्टीच्या आदिसंकल्पाशी कनेक्टिव्हिटी साधून असतात.
weekly horoscope 16th june 2024 to 22nd june 2024
weekly horoscope 16th june 2024 to 22nd june 2024Sakal
Published on

वैवाहिक जीवनात सुवार्तांचा काळ

मेष : तरुणांना पौर्णिमेकडं झेपावणारं सप्ताहातील चंद्रबळ आणि शुभग्रह योगाची साथसंगत शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांच्या माध्यमातून उत्तम कनेक्टिव्हिटी देईल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती शुभघटनांतून किंवा विशिष्ट यशातून चांगल्याच फ्लॅशन्यूज देतील. सप्ताहाचा शेवट मोठा झगमगाटी राहील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १८ चे एकादशीचं प्रभावक्षेत्र वैवाहिक जीवनातून सुवार्ताचं.

थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ

वृषभ : राशीच्या गुरुचं अधिष्ठान राहील आणि बुध-शुक्र युती योगाचं पॅकेज विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ देतील. थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ. सप्ताहात कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं ग्लॅमर मिळेल. ता. १९ ते २१ हे दिवस प्रचंड गतिमान राहतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती ता. २० जूनचा गुरुवार विशिष्ट वैयक्तिक सोहळा साजरा करतील. पुत्रोत्कर्षातून धन्यता. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरीत वाद टाळावेत.

व्यवसायात चांगला फायदा होईल

मिथुन : पौर्णिमेचा सप्ताह बुध-शुक्र युतियोगाच्या पार्श्‍वभूमीवर अतिशय रंगसंगतीचा राहील. विवाहविषयक अंतिम गाठीभेटी होतील. सप्ताहात आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती ‘मॅन ऑफ दि मॅच’ होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लॉटरी लागेल. उद्याचा सोमवार झकास गाठीभेटीचा. पौर्णिमा व्यावसायिक उत्सव प्रदर्शनं गाजवणारी. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार विचित्र खर्चाचा, नुकसानीचं भय सतावेल.

थट्टामस्करी जपून करा

कर्क : सप्ताह चैनी करमणुकीवर खर्च करणारा. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ विशिष्ट मानसन्मानातून धक्का देईल. घरात विवाहकार्य ठरतील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपाची फळं देईल. घरातील स्त्रीवर्गाची मने जपा. थट्टामस्करी सांभाळा. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा देवदर्शन घडवेल. गुरुची प्रचिती येईल. नोकरीत प्रशंसा होईल.

नोकरीत वरिष्ठांची साथ मिळेल

सिंह : पौर्णिमेचं एक उधाण राहील. सप्ताहावर बुध-शुक्र युती योगाचं पॅकेज पूर्णपणानं अंमल करेल. मघा नक्षत्राच्या व्यक्ती विजयी चौकार-षटकार ठोकतील. सप्ताहारंभ मुलाखती, गाठीभेटी आणि करारमदार आदी बाबींतून मोठा फलद्रूप होणारा. नोकरीतील वरिष्ठांची साथ मोठी उपयोगी पडेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपाचं ठरेल. प्रिय व्यक्तींबरोबर गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या.

सरकारी कामं होतील

कन्या : वाढतं चंद्रबळ शुभग्रहांना बळ देईल. म्हणाल तसं होईल. नोकरीतील औदासीन्य जाईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवार जल्लोषाचा राहील. नोकरीत बढतीची चाहूल. व्यावसायिकांच्या जाहिराती फलद्रूप होतील. मंत्रालयातील कामं होतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ व २२ हे पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र मोठ्या जल्लोषाचं. पती व पत्नीचा विलक्षण भाग्योदय होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेजवळ संसर्ग जपावा.

कला-छंदातून मोठं यश

तूळ : पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवरील बुध-शुक्र युती योगाचे पॅकेज आपल्या राशीस एकूणच छान लाभ करून देईल. उद्याचा सोमवार तरुणांना मोठा वाव देणारा. काहींना कला वा छंद माध्यमातून मोठं यश येईल. चित्रा नक्षत्राच्या माध्यमांतून लाभ. स्वाती नक्षत्रास पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र सहली करमणुकीतून भावरम्य राहील. नोकरीतील वरिष्ठांचा अनुग्रह धक्का देईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा मातृचिंतेची ठरण्याची शक्यता.

जुन्या गुंतवणुकीतून मोठे लाभ

वृश्‍चिक : पौर्णिमेजवळ शुभग्रहांची लॉबी क्रियाशील राहील. वसुली होईल. तरुणांची कार्ये ठरतील. सप्ताहारंभ प्रवासातील कामं यशस्वी करणारा, जुन्या गुंतवणुकीतून मोठा लाभ होईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आरंभ आणि शेवट मजेदार फळ देईल. घरात आनंदोत्सव होतील. तरुणांना नोकऱ्या मिळतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना वसुलीतून लाभ. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेजवळ वृद्धांशी वाद टाळावेत.

व्यावसायिक करारात यश

धनु : सप्ताहातील वाढतं चंद्रबळ बुध-शुक्र युती योगातून अमृतवर्षाव करणारं. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मूळ नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मोठा झगमगाटी राहील. वैयक्तिक उपक्रम यशस्वी होतील. व्यावसायिक करारमदार होऊन यशस्वी वाटचाल सुरू होईल. तरुणांच्या मुलाखती यशस्वी होतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहारंभ वसुलीचा, मित्रांकडून लाभ होतील.

तरुणांना मुलाखतींमध्ये यश

मकर : सप्ताह चंद्रबळातून लाभ देणारा. उद्याचा सोमवार शुभग्रहांच्या साथसंगतीचा. महत्त्वाचे करारमदार होतील. तरुणांच्या मुलाखती यशस्वी होतील. काहींना राजकीय व्यक्तींकडून लाभ होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकीतून धनवर्षाव होईल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ व १९ हे दिवस दैवी चमत्कार घडवतील. व्यावसायिक शत्रुत्व संपेल. पती वा पत्नीची चिंता जाईल.

महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल

कुंभ : बुध-शुक्र युतीची पार्श्वभूमी पौर्णिमेचं उधाण वाढवील. बुद्धिजीवी मंडळींना मोठा वाव. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट तरुणांचे निकडीचे प्रश्‍न सोडवेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींवर हा सप्ताह विवाहविषयक स्थळांचा वर्षाव करेल. उद्याचा सोमवार महत्त्वाच्या गाठीभेटींचा. व्यावसायिक पातळीवर बँकांची कामं मार्गी लागतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह म्हणजे एक पर्वणी राहील. विशिष्ट महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल.

विक्रमांची नोंद कराल

मीन : गुरुच्या राशीस वाढतं चंद्रबळ पौर्णिमेपर्यंत चढत्या क्रमानं उत्तम फळ देईल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट विक्रम नोंदवतील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट नोकरी-व्यावसायिक क्षेत्रात सुंदर पर्व सुरू करेल. थोरामोठ्यांच्या सहकार्यातून भाग्य उजळेल. पती व पत्नीचा भाग्योदय. विशिष्ट समारंभ घडवेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ अन्नपाण्यापासून संसर्ग होऊ शकतो. प्रवासात काळजी घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com